पुणे:- कल्याणी नगर येथील हिट अँड रन प्रकरणातील तपासी अधिकाऱ्यांना निलंबित करुन गुन्हे दाखल करावेत, पोलीस आयुक्तांना हटवावे या मागणीसाठी आमदार रविंद्र धंगेकर यांनी शुक्रवारी पोलिस आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.कल्याणीनगर अपघात प्रकरणातील तपास अधिकारी यांना निलंबित करुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी धंगेकर यांनी पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.यावेळी त्यांनी या प्रकरणी तपास अधिकारी यांना निलंबित करुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करावा तसेच पोलीस आयुक्त यांची बदली करावी अशी मागणी केली आहे.
यावेळी धंगेकर म्हणाले की गेल्या काही दिवसांपासून मी शहरातील अंमली पदार्थ तसेच पब संस्कृती याविषयी मी सातत्याने आवाज उठवत आहे. परंतु हे सरकार गुन्हेगारांच्या सोबत असून दोन दिवसांपूर्वी ज्या दोन मुलांचा अपघातमध्ये जीव गमवावा लागला तो अपघात नसून एक प्रकारची हत्या करण्यात आली आहे.या प्रकरणाचा ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी तपास केला त्यांनी त्यामध्ये अनेक त्रुटी ठेवल्या आहेत. कल्याणी नगर मधील हिट अँड रन प्रकरणात दोन एफआयआर करण्यात आले.ज्या पद्धतीने हा तपास करण्यात आला आहे ते पाहता पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा.तसेच पोलीस स्टेशन हे प्रकरण दाबण्यासाठी करोडो रुपयांचा व्यवहार केला गेला आहे,ते पाहता हा संपूर्ण प्रकरण पुणे पोलिसांच्या विश्वासाबद्दल प्रश्न चिन्ह निर्माण करणारे आहे.हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवण्यात यावे अशी मागणी यावेळी धंगेकर यांनी केली.पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे सुद्धा या प्रकरणात तितकेच जबाबदार आहेत त्यामुळे गृहमंत्र्याणी त्यांची तातडीने बदली करावी.या प्रकरणाची निवृत्त न्याधीश्यांमार्फत चौकशी झाली पाहिजे अशी मागणी देखील धंगेकर यांनी यावेळी केली.