पुणे- कोथरूडच्या चांदणी चौकाजवळ दरोडा पडत असतानाच नियंत्रण कक्षाला मिळालेल्या माहितीवरून घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी अगदी सिनेमा स्टाईलने राजस्थानी दरोडेखोरांना पकडून गजा आड केले. हे तिघेही चोरटे १९/ २० वर्षे वयाचे आहेत .
या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’ दि.२३/०५/२०२४ रोजी घर, सर्व्हे नं.९९, १/२५, पाण्याच्या टाकीजवळ चांदणी चौक, कोथरुड पुणे येथे चोर चोरी करणेसाठी आले आहेत असा नियंत्रण कक्षा कडून कॉल प्राप्त झालेवरून कोथरूड पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरणाचे पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार, असे प्राप्त झालेल्या कॉलपॉईटचे ठिकाणी तात्काळ पोहोचले. सदर ठिकाणी तक्रारदार यांनी घरामध्ये हत्यारबंद इसम असून ते घरामध्ये दरोडा टाकत आहेत व काही इसम आजू बाजूस आहेत असे सांगितलेवरून गुन्हे प्रकटीकरणाचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी स्वतःकडील वेपन लोड करून संपुर्ण घराला वेढा टाकून तसेच घरामध्ये मागील बाजूने टेरेसवर चढून बाहेर पडण्याचे सर्व मार्ग अत्यंत शिताफीने हत्यारबंद पोलीसांकडून
बंद केले. त्यानंतर घराचा दरवाजा तोडून हत्यारबंद अधिकारी अंमलदार यांनी नियमबंध मुव्हमेंट करीत घरामधील एक एक रूम चेक करीत पुढे गेले असता आरोपी हे घरातील बेडरूममधील बाथरूममध्ये लपल्याचे जाणवले. त्यावेळी सदर बेडरूममध्ये जाऊन बाथरूमचा दरवाजा तोडला, सदरवेळी बाथरूमध्ये लपून बसलेले तीन दरोडेखोरापैकी एका दरोडेखोराचे हातामध्ये लोंखडी कोयता, लोखंडी हातोडी व कटावणी अशी हत्यारे होती, सदर दरोडेखोरांनी हातामधील हत्यारांसह पोलीसांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. परंतु हत्यारबंद पोलीस पथकाने नमूद तिन्ही दरोडेखोर इसमांना अत्यंत चलाखीने त्यांचेकडील हत्यारांसह थरारकरित्या शिताफीने पकडून ताब्यात घेतले. त्याचवेळी पोलीस पथकामधील इतर पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी पळून गेलेले इसमांचा नमूद संपुर्ण भागात शोध घेतला, परंतु पळून गेलेले साथीदार इसम मिळून आले नाहीत. हत्यारांसह ताब्यात घेतलेल्या दरोडेखोर इसमांकडे विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नाव पत्ते १) कालु पुकराज झिनेगल वय २० वर्षे रा. तिलकनगर, भिलवाडा राजस्थान, २) कन्हैयालाल हिरालाल कुमावत वय १९ वर्षे रा. जोगनीया हॉटेल आझादचौक, भिलवाडा रेल्वे स्टेशनजवळ भिलवाडा राजस्थान, ३) प्रिन्स चांदमल खाटीक (चंदेल) वय २० वर्षे,
रा. दादाबाडी, भिलवाडा राजस्थान, असे असल्याचे सांगितले. त्यानंतर कोथरूड पोलीस ठाणे येथे गु.र.नं.१४४/२०२४, भादवि कलम ३९५,४२७, भारतीय हत्यार कायदा ३,४,२५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७(१), १३५ प्रमाणे दाखल करून दाखल गुन्हयात जेरबंद केलेल्या या दरोडेखोर आरोपींना अटक केली आहे.सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार,. पोलीस सह आयुक्त, प्रविण पवार,अपर पोलीस आयुक्त,. मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त, कोथरूड विभाग भिमराव टेळे, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोथरुड पोलीस ठाणे,संदिप देशमाने, सपोनि बालाजी सानप, सपोनि रविंद्र आळेकर, पोउनि बसवराज माळी, पोलीस अंमलदार माळी, चौधर, भाटे, मुळे, राठोड, शेळके, चोपडे, पवार, शिंदे, पांढरे, भगत, भवर व हुलगे यांनी केली आहे