पुणे- कल्याणीनगर अपघाताच्या प्रकरण नंतर आता पब्ज च्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करून बिनदिक्कत पणे एका दिवसात पुन्हा तिथेच अनधिकृत बांधकाम करणाऱ्या हॉटेल पब्ज वर आज पुन्हा कारवाई करत महापालिकेने आज मुंढवा येथील वॉटर्स, ओरीला, अनवाईट, हिगोणे, कार्निवल, बॉटल फॉरेस्ट, मासा, व चिलीज तसेच घोरपडी येथील Q बार, पेंटाहाऊस, स्पाईस फॅक्टरी व आकारी या हॉटेलस / रेस्टोरंट वर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.आता पोलीस या वर काय कार्यवाही किती झटपट करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. महापालिकेने आज एकूण १४ हॉटेल वर कारवाई केली.आणि १५९२५ चौ. फुट क्षेत्र मोकळे केले.
बांधकाम विकास विभाग पुणे महानगरपालिके कडून मुंढवा, कोरेगावपार्क, एरंडवणा, सदाशिव पेठ या भागामध्ये हॉटेल, रेस्टॉरंवर कारवाई करण्यात आली.या कारवाईत एकूण २ गटात विभागणी करण्यात आली असुन खालीलप्रमाणे स्टाफ व मशिनरी उपलब्ध करण्यात आली होती. कारवाईसाठी एकूणआज दिनांक २४/५/२०२४ रोजी घेण्यात आलेल्या रेस्टॉरट हॉटेलस यांचे साईड मार्जिन मधील अनाधिकृत केलेल्या शेडस या पूर्वी कारवाई करून काढून घेण्यात आलेल्या होत्या या शेडस ह्या संबंधितांनी परत उभारणी केली असल्यामुळे आज सदर शेडस परत काढून घेण्यात आलेल्या आहेत. या व्यतिरिक्त आज रोजी मुढवा येथील वॉटर्स, ओरीला, अनवाईट, हिगोणे, कार्निवल, बॉटल फॉरेस्ट, मासा, व चिलीज तसेच घोरपडी येथील Q बार, पेटाहाऊस, स्पाईस फॅक्टरी व आकारी या हॉटेलस / रेस्टोरट वर गुन्हा दाखल करण्यात आला.
संबधित अनधिकृत बांधकाम धारका विरुद्ध महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 चे कलम 53 व 54 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनधिकृत बांधकाम करणे महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट अॅॅक्ट १९६३ मधील कलम १३ खालील अपराध फौजदारी स्वरूपाचा आहे.