Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

कारचालक बदलण्याचा प्रयत्न झाल्याचे पोलीस आयुक्तांनी केले स्पष्ट

Date:

पुणे-पुणे हिट ॲंड रन प्रकरणात अग्रवाल यांच्या कारचालकावर तो कर चालवत नसताना तोच चालवत असल्याचे सांगण्यासाठी दबाव होता, असे पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटले आहे. येरवडा पोलिस ठाण्यात आरोपी पिझ्झा पार्टी देण्यात आली नाही, असेही पोलिस त्यांनी या प्रकरणी स्पष्ट केले आहे.येरवडा पोलिस ठाण्यात पोलिसांची पिझ्झा पार्टी झाल्याचे अद्याप दिसून आले नाही. पहिला आरोपीचा ब्लड नमुना हा सकाळी आठ वाजता गुन्हा दाखल झाल्यावर 11 वाजता करण्यात आली. तर दुसरा ब्लड रिपोर्ट हा सायंकाळी सात ते आठ वाजता घेण्यात आली. पुराव्यात ज्यांनी हस्तक्षेप केला त्यांच्यावर कलम 201 नुसार कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

पोलिस आयुक्त म्हणाले की, घटनेच्या दिवशी अल्पवयीन आरोपी हा कार चालवत नव्हता तर कार चालक गाडी चालवत होता असे सुरवातीला सांगण्यात येत होते. काही घटनाक्रम बदलणे प्रयत्न झाल्याचे दिसून येत आहे. कार चालक याने मी गाडी चालवत होतो असे सुरुवातीला सांगितले याबाबत नेमका कोणाचा दबाव होता, याबाबत चौकशी केली जाणार आहे. पोलिसांकडून जी कारवाई करण्यात आली ती नियमाने करण्यात आली. या घटनेबाबत दोन एफआयआर करण्यात आले आहे. मात्र, हे एकच एफआयआर घटना असल्याचे कोर्ट डायरी आहे अशी माहिती पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

अमितेश कुमार म्हणाले की, कल्याणीनगर अपघात प्रकरणात मध्यरात्री अडीच वाजता प्रकार घडलं आहे. त्यानंतर गुन्हा दाखल होऊन आरोपी यांच्यावर कलम 304 लावण्यात आले आहे. त्याचदिवशी बाल न्यायालय यांच्याकडे अल्पवयीन आरोपी यास सज्ञान समजून सुनावणी करावी तोपर्यंत त्यास बाल सुधारगृहात ठेवावे असे याचिका दाखल केली. पण ती फेटाळून लावली होती. त्यानंतर पुन्हा आम्ही याबाबत न्यायालयात दाद मागितली आणि आवश्यक पुरावे दिले त्यानुसार मुलास 14 दिवस बाल सुधारगृहात पाठवण्यात आले.याबाबत आरोपी यांचे वडील यांच्यावर देखील गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. ही केस आम्ही गांभीर्याने तपास करत आहे. आवश्यक पुरावे, तांत्रिक पुरावे आम्ही गोळा करत आहे. पुरावे कोणी नष्ट करण्याचा प्रयत्न केला याबाबत सहायक पोलिस आयुक्त दर्जाचे अधिकारी तपास करत आहे. अपघात मध्ये जे मयत झाले त्यांना लवकर न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे. याप्रकरणात विशेष सरकारी वकील नेमण्यात येणार आहे.

पोलिस यांच्याकडून कारवाईस दिरंगाई झाली असे सांगितले जाते पण पोलिस याबाबत कोणते चुका होणार नाही हे लक्षात घेऊन चौकशी करत आहे. सुरवातीला कलम 304 लावण्यात आला नाही किंवा आरोपीला सुविधा देण्यात आल्या याबाबत तपास करण्यात येत आहे. याबाबत त्यास विशेष सेवा पुरवली यात काही तथ्य नाही. जनता यास आमचे आव्हान आहे की, आम्ही याबाबत योग्य तपास करून त्याला तडीस नेऊ. या घटनेत आरोपी याचे ब्लड रिपोर्ट अद्याप प्राप्त झाले नाही. केस आमची केवळ ब्लड रिपोर्ट वर अवलंबून नाही.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ट्रेलरमधील सळ्या केबिनमध्ये घुसल्या, चालकाचा दुर्दैवी अंत

पुणे-पुण्यात अवजड वाहनांकडून होणाऱ्या अपघातांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे....

नवी मुंबईतील कंपनीत गॅस गळती:कामगारांवर कार्बन मोनॉक्साईडचा परिणाम, 25 महिला बेशुद्ध

नवी मुंबईतील एका कंपनीमध्ये गुरुवारी सकाळी गॅस गळतीची घटना...

PMRDA आयुक्त यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या दहाव्या वर्धापन...