पुणे-पुण्यातील हॉटेल ,पब्ज ,बार यांनी केलेली टेरेस वरची असो वा नाय कोणतीही बांधकामे असो अनधिकृत असतील ती पाडाच आणि त्या सोबत संबधित मालकांच्या वर फौजदारी गुन्हे देखील पोलीस ठाण्यात जाऊन नोंद करा ,FIR दाखल करा असा पवित्रा महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले आणि प्रशासनाने घेतला आहे.त्यानुसार आजपासून महापालिकेचे अधिकारी कामाला लागल्याचे वृत्त आहे.
कल्याणी नगर अपघातानंतर महापालिकेने देखील आता आक्रमक धोरण स्वीकारले आहे, पोलिसांनी जर गुन्हे दाखल करण्यास नकार दिला तर याबाबत पुढी कार्यवाही करण्याचे महापालिकेने ठरविलेले आहे . अनधिकृत बांधकामे केल्यानेच रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी होत असल्याचे महापालिका प्रशासनाचे स्पष्ट म्हणणे आहे. अशी अनधिकृत बांधकामे समूळ नष्ट करून तेवढ्यावर न थांबता त्यांच्यावर पोलीस ठाण्यात जाऊन FIR देखील दाखल करा असे आदेश प्रशासनाला दिल्याचे वृत्त आहे.