पुणे-पोर्शे गाडी अपघात प्रकरणात पुण्याच्या पोलिसांवर कोणाचा कशासाठी दबाव होता ? याचे उत्तर द्यावेच लागेल असा आक्रमक पवित्रा आज खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतला .पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या उजनीतील बोट बुडाल्याने झालेला अपघात तसेच राज्यातील ड्रग्ज कनेक्शन, दुष्काळ परिस्थिती यावर त्यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केले. ललित पाटील प्रकरणाचे पुढे काय झाले ? पोर्शे गाडीच्या अपघातात २ लोकांची हत्या झाली यात राजकीय दबाव कोणी कशासाठी आणला होता ? असे प्रश्न विचारीत त्यांनी ..देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरे दिलीच पाहिजेत असा आक्रमक पवित्रा घेतला.