पुणे-कुख्यात गुंड शरद माेहाेळ याचा काेथरुड परिसरात भरदिवसा घराजवळच जवळच्या सहकाऱ्यांनी निघृण खून केल्याचा प्रकार घडला हाेता.या प्रकरणात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुरुवारी या प्रकरणी विशेष न्यायाधीश आर. व्ही. कचरे यांच्या न्यायालयात तब्बल 2 हजार पानांचे दोषारोपपत्र सादर केले आहे .पोलिसांनी या प्रकरणी या हत्याकांडाचा मुख्य सुत्रधार गणेश मारणे, विठ्ठल शेलार, साहिल ऊर्फ मुन्ना पाेळेकर, नामदेव कानगुडे, अमर कानगुडे, चंद्रकांत शेळके, विनायक गव्हाणकर, विठ्ठल गांदले, अभिजीत मानकर , अॅड. रवींद्र पवार, अॅड.संजय उडान, धनंजय वटकर, सतीश शेडगे, नितीन खैरे, आदित्य गाेळे, संताेष कुरपे, माेहन पांगारे अशा एकूण 17 आराेपींना अटक केली आहे.
माेहाेळ हत्या प्रकरणात आराेपींवर पाेलिसांनी माेक्का अंर्तगत कारवाई केलेली आहे. शरद माेहाेळ हा 5 जानेवारी राेजी काेथरुड परिसरातील सुतारदरा येथील राहते घरातून बाहेर पडल्यानंतर त्याचा सहकारी मुन्ना पाेळेकर व इतरांनी मिळून त्याच्यावर जवळून गाेळ्या झाडल्या होत्या. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला होता. हत्येनंतर हल्लेखोर पसार झाले होते.या गुन्ह्याची घटना सीसीटीव्हीत देखील कैद झाली हाेती. पाेलिस चाैकशीत आराेपींच्या माेबाईल मधून सुत्रधार व इतरांशी करण्यात आलेल्या संर्पकाच्या तब्बल 19 हजार 827 क्लीप पाेलिसांना मिळून आल्या. त्यातील गुन्ह्याच्या कटाच्या 6 महत्वपूर्ण क्लीप पुराव्याच्या दृष्टीने न्यायालयात सादर करण्यात आल्या. आराेपींनी गुन्हा करण्यासाठी व नंतर वापरलेल्या 7 गाड्या देखील पाेलिसांनी जप्त केल्या आहेत.गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार गणेश मारणे व विठ्ठल शेलार हे गुन्हा केल्यानंतर पसार झाले हाेते. शेलार यास पनवेल मधून, तर मारणे याला संगमनेर परिसरातून पाठलाग करुन पाेलिसांनी पकडले होते. फरार काळात त्यांनी बंगळुरु, ओडिशा, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र असे विविध राज्यात प्रवास केला होता. विठ्ठल शेलार वापरत असलेली कार देखील यादरम्यान पाेलिसांनी हस्तगत केली. जमीनीच्या व आर्थिक व्यवहाराच्या वादातून गणेश मारणे व विठ्ठल शेलार यांनी जुलै 2022 पासून शरद माेहाेळ याच्या खुनाचा कट साथीदारांसह शिजवला. याकरिता आराेपींनी हडशी परिसरात गाेळीबाराचा सराव केला हाेता. सरकारी पक्षातर्फे प्रमाेद बाेंबटकर यांनी पाेलिसांची बाजू न्यायालयात मांडली.