पुणे- मुंढवा, कोरेगावपार्क, घोरपडी, पुणे स्टेशन, कल्याणीनगर, विमाननगर या परिसरातील ७रुफ टॉप हॉटेलसह ४० ठिकाणी अतिक्रमण विभागाने आज कारवाई केली. या कारवाईत ५४३०० चौ. फुट क्षेत्र मोकळे करण्यात आले.
महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाकडून पुणे महानगरपालिकाक्षेत्रातील अनधिकृत हॉटेल, रेस्टॉरंटतसेच रुफ टॉप
हॉटेल वर कारवाई हाती घेतली. यामध्ये कार्यकारी अभियंता झोन क्र. ४ कडून मुंढवा, कोरेगावपार्क, पुणे स्टेशन, कल्याणीनगर, विमाननगर, घोरपडी या भागामध्ये हॉटेल, रेस्टॉरंवर कारवाई करण्यात आली. मुंढवा भागामध्ये नदी लगत असलेले मोठे हॉटेल्स, हॉटेल अनवाईड, हॉटेल सुपरक्लब, ओरीला नव्याने चालू असलेले हॉटेल मधील अनाधिकृत बांधकाम, जॉ कटर च्या माध्यमातून पूर्ण पाडण्यात आलेले आहे. या मधील काही हॉटेल्स हे पब्स म्हणून वापरात होती.
या भागामधील कारवाई दरम्यान ढोले पाटील वॉर्ड ऑफिस कडील संयुक्त कारवाई देखील नियोजित करण्यात आली होती. त्याचेकडून रस्त्यावरील अतिक्रमन, बोर्ड बॅनर्स (आकाश चिन्ह परवाना विभाग ) काढून टाकण्याची कारवाई करण्यात आली.
सदर कारवाईत एकूण ५ गटात विभागणी करण्यात आली असुन कारवाईसाठी एकूण खालीलप्रमाणे स्टाफ व मशिनरी उपलब्ध करण्यात आली होती.
आज दिनांक २२/५/२०२४ रोजी घेण्यात आलेल्या रेस्टॉरट हॉटेलस यांचे साईड मार्जिन मधील अनाधिकृत केलेल्या शेडस या पूर्वी कारवाई करून काढून घेण्यात आलेल्या होत्या सदर शेडस ह्या संबंधितांनी परत उभारणी केली असल्यामुळे आज सदर शेडस परत काढून घेण्यात आलेल्या आहेत. यातील काही ठिकाणी ३-४ वेळ कारवाई करण्यात आलेली आहे. सदर कारवाईचा अहवाल व वापरण्यात आलेली मशनरी खालील प्रमाणे आहेत.
१ एकूण कारवाईची ठिकाणे – ४०
२ मोठ्या स्वरूपातील हॉटेल – ३
३ छोटी हॉटेल / दर्शनी व सीमा अंतरे ३० नग
४. रुफ टॉप हॉटेल ७ नग
५. एकूण कारवाई – ५४३०० चौ. फुट
६. अभियंता वर्ग – १०
७ पोलीस – २९
८ एम. एस. एफ. ४५
९. लेबर – ४०
१०. जॉ क्रशर – १
११. जे.सी.बी. – ७
१२. ब्रेकर – ३
१३. गॅस कटर – 3
७ रुफ टॉप हॉटेलसह ४० ठिकाणी अतिक्रमण विभागाची कारवाई
Date: