पुणे-शहरात पब, बार आणि एकूणच रात्रीस खेळ चाले अशी सुरु असलेली परिस्थिती तातडीने बंद झाली पाहिजे अशी भूमिका भाजपचे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी घेतली आहे . आणि या अनुषंगाने त्यांनी महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांना पत्रेही दिली आहेत .KP मध्ये एका गर्भ श्रीमंत बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने नवी कार भरधाव वेगाने दारूच्या नशेत चालवून दोघांचा बळी घेतल्यावर शहरात या नाईट लाईफ बद्दल संतापाची लाट उसळली आहे याबाबत बोलताना खर्डेकर म्हणाले कि,’पुण्यातील नाईट लाईफ बाबत ची चर्चा सध्या सर्वत्र सुरु असून केवळ पब संस्कृतीच नव्हे तर रस्त्यावर किंवा काही प्रमुख चौकांमध्ये देखील “रात्रीस खेळ चाले” अशी परिस्थिती आहे.नळस्टॉप चौकातील खाद्य पदार्थ्यांचे स्टॉल व हातगाड्यांबद्दल तेथील नागरिक तक्रार करून दमलेत.नळस्टॉप चौकातील सर्वदर्शन सोसायटी ने तर सर्वत्र अर्ज केले, कोणतेही एन ओ सी दिले नसताना त्यांच्या येथे पहाटे पर्यंत तरुण तरुणींचा धिंगाणा आपण इंस्टाग्राम वर पण बघू शकतो.
https://www.instagram.com/reel/CzJ-afyIr9-/?igsh=bjFweHBwOHIyOXhn
त्यात भर की काय म्हणून पुढे एस एन डी टी कॉलेज समोर असलेल्या मेट्रो स्टेशन समोर आता एक खाऊ गल्ली सुरु होतं असून तेथे 24×7 चा फलक लागला आहे.
अश्या सर्व प्रकरणात आता पोलीस आणि मनपा ने संयुक्त कारवाई करणे गरजेचे असून हा केवळ पुण्याची संस्कृती रक्षणाचा विषय नसून भावी पिढीला विनाशापासून वाचविण्यासाठी आता कठोरतम कारवाई करावी अशी आग्रही मागणी करत आहे.