Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

गर्भलिंग निदान करणाऱ्या टोळीवर कडक कारवाई करा- विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे निर्देश…

Date:

डॉ.गोऱ्हे यांच्या पत्रावर कार्यवाही करण्याची सार्वजनिक आरोग्य अवर सचिव मिलिंद म्हैसकर यांनी घेतली दखल

पिंपरी दि.१८ : गर्भातच मुली मारण्याची क्रूरता पुरोगामी महाराष्ट्रात अद्यापही सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापूर येथे उघडकीस आला याची विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली आहे. सदर प्रकरणात मुख्य सूत्रधार युवराज गोविंद चव्हाण (वय -३९ रा. प्रयाग चिखली, संजय कृष्णा पाटील (रा. वरणगे पाडळी, डॉ. हर्षल रविंद्र नाईक (रा. फुलेवाडी), विजय लक्ष्मण केळुस्कर (या. गारगोटी) यांना अटक केली आहे. आणखी दोन जण फरार आहे.
असाच प्रकार छत्रपती संभाजीनगर येथील सिल्लोड तालुक्यातील गारखेडयातील गर्भलिंग निदान रॅकेट प्रकरणात पुंडलिकनगर पोलीसांनी गर्भपात करणार्‍या जिल्ह्यांतील सर्वात मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला. या अगोदर इस्लामपूर, सांगली, सातारा, बीड जिल्ह्यात घडल्या आहेत. बीड जिल्ह्यात दर हजारी मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण कमी आहे. तसेच बीड जिल्ह्यात गर्भाशय काढून टाकल्याचे धक्कादायक प्रकार घडले आहे.

  • याबाबत डॉ.गोऱ्हे यांनी सर्व जिल्हा प्रशासनाने शासनाच्या सर्व संबंधित खात्यातील अधिकाऱ्यांची धडक कारवाई पथके तयार करावीत. या कारवाई पथकामार्फत सोनोग्राफी सेंटर्सला बंधनकारकरित्या भरून घेण्यात येणारा फाँर्म – एफ भरला असल्या बद्दल खात्री करून घ्यावी अशी सूचना आरोग्य सचिव श्री मिलिंद म्हैसकर यांना केल्या आहेत.
  • सर्व जिल्हा व तालुका मुख्यालयात अशा कृत्य करणार्‍या टोळीबद्दल माहिती देणार्‍या करीता निशुल्क फोन सेवा व प्राधिकृत अधिकार्‍यांचे पत्ते प्रसिद्ध करून, निनावी पत्रे व फोन यांची दखल घेऊन अशा सर्व तक्रारीची/माहितीची प्राथमिक चौकशी नियमितपणे करावी व त्या संबंधिचा अहवाल ही दर तीन महिन्यांनी प्रसिद्ध करावा.
  • जिल्हा व तालुका स्तरावर लोकप्रतिनिधीची एक समिती महिला विषयक सर्व प्रकारच्या कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्थापन करावी व दर सहा महिन्यांनी त्यांना अशा प्रकरणांची व कार्याची माहिती द्यावी व त्यांच्या सूचनांची अंमलबजावणी करावी.
  • कोल्हापूर ते आंबेवाडी, चिखली रोड येथील एरियाची तपासणी करून कारवाई करण्यात यावी अशीही सूचना डॉ.गोऱ्हे यांनी सार्वजनिक आरोग्य सचिव श्री. म्हैसकर यांना केल्या आहेत.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ट्रेलरमधील सळ्या केबिनमध्ये घुसल्या, चालकाचा दुर्दैवी अंत

पुणे-पुण्यात अवजड वाहनांकडून होणाऱ्या अपघातांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे....

नवी मुंबईतील कंपनीत गॅस गळती:कामगारांवर कार्बन मोनॉक्साईडचा परिणाम, 25 महिला बेशुद्ध

नवी मुंबईतील एका कंपनीमध्ये गुरुवारी सकाळी गॅस गळतीची घटना...

PMRDA आयुक्त यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या दहाव्या वर्धापन...