पुणे-सोलापूर महामार्गावर होर्डिंग कोसळल्याची घटना घडली आहे. लोणी-काळभोरमध्ये हे होर्डिंग कोसळलं आहे. होर्डिंगच्या बाजूलाच बँड पथक होतं अन् अनेक गाड्या पार्क केलेल्या होत्या.यात होर्डिंग खाली उभा असलेला बँड पथकातील घोडा गंभीर जखमी झाला आहे. अनेक गाड्यांचे नुकसान झाले आहे.पुणे-सोलापूर महामार्गावरील कवडीपाट टोकनाक्याजवळ हि घटना घडली आहे. लॉन्सच्या समोर हे होर्डिंग होतं. होर्डिंग कोसळल्याने टू-व्हीलर, चारचाकी आणि बँड पथकाच्या गाडीचे नुकसान झाले आहे. सायंकाळी साडेचारच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण घोडा गंभीर जखमी झाला आहे
शहर आणि परिसरामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. तसेच जोराचा वारा देखील वाहू लागला आहे. यावेळी लोणी-काळभोर येथील होर्डिंग कोसळले. जवळच एक लग्नकार्य पार पडले होते. त्यामुळे बँड पथक या होर्डिंगच्या बाजूला उभे होते. बँड पथकातील दोन घोडे देखील तेथे उभे होते. अचानक होर्डिंग पडल्यामुळे एका घोडा जखमी झाला आहे.