पुणे-महादेव बुक व लोटस ३६५ या बेटिंग ॲप वरून ऑनलाइन सट्टा चालवणाऱ्या नारायणगाव येथील चार मजली इमारतीवर पुणे ग्रामीण पोलिस पथकाने धाड टाकून सुमारे ९० कर्मचारी यांच्यासह जुन्नर तालुक्यातील दोन प्रतिष्ठित व्यापाऱ्यांच्या मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या बेटिंगचे मुख्य सूत्रधार ऋतिक कोठारी (रा. नारायणगाव) व राज बोकरिया (रा. जुन्नर) हे दोघे आहेत असून ते फरार आहेत .
नारायणगाव येथील व्हिजन गॅलेक्सी येथे चार मजली इमारत १ लाख ६० हजार रुपये प्रति मासिक भाडेतत्त्वावर भाड्याने घेऊन या ठिकाणी गेल्या दोन महिन्यांपासून हे बेटिंग सुरू होते. ऋतिक कोठारी (रा. नारायणगाव) व राज बोकरिया (रा. जुन्नर) या दोघांनी फेब्रुवारी २०२४ मध्ये इमारत भाड्याने घेतली होती. या इमारतींमध्ये सुमारे ९० कर्मचारी कार्यरत होते . पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांना ऑनलाइन बेटिंगची माहिती मिळाल्यानंतर १४ मे रोजी रात्री ११ वाजता २० ते २५ पोलिस पथकाने या इमारतीवर धाड टाकली. या इमारतीमध्ये सुमारे ९० कर्मचारी कार्यरत होते. त्यांना जेवण बनवून देण्यासाठी ६ ते ७ कर्मचारी कार्यरत होते . बेटिंग घेणाऱ्या ९० कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. कॉल सेंटरप्रमाणे येथील कर्मचारी कार्यरत होते. कोणालाही बाहेर जाण्याची मुभा नव्हती. जुन्नर, महाराष्ट्रातील काही कर्मचारी सोडले तर बहुंताश कर्मचारी परप्रांतीय आहेत. सर्व कर्मचारी शिफ्टनुसार काम करत होते. अनेक संगणक, लॅपटॉप, आयपॅडद्वारे बेटिंग आणि आर्थिक देवाणघेवाण सुरू होती. महादेव बुक व लोटस ३६५० या ॲपमध्ये विविध खेळांचे सट्टे, सर्व गेम्स खेळले जात असत. जिंकणारे व हरणाऱ्या व्यक्तींना पैशांची देवाणघेवाणसाठी स्वतंत्र व्यवस्था ठिकाणावरून वापरली जात होती. दररोज सुमारे ५० लाख रुपयांचे बेटिंग या ठिकाणी केले जात असल्याचे विश्वासनीय वृत्त आहे. या व्हिजन गॅलेक्सीमध्ये सुमारे १२० फ्लॅटधारकांसह व्यावसायिक कार्यरत होते, मात्र येथे काय चालते याची कल्पनाही रहिवाशांना नव्हती.