,
बद्रीनाथ धामचे द्वार रविवारी सकाळी ६ वाजून १२ मिनिटांनी हजारो भाविकांच्या उपस्थितीत उघडले. मुख्य पुरोहित ईश्वर प्रसाद नंबुदरी यांनी सर्वप्रथम गाभाऱ्यात प्रवेश केला. गतवर्षी द्वार बंद करताना भगवान विष्णूच्या मूर्तीवर लावलेले तूप आणि घोंगडी तशीच कायम होती. हे पाहिल्यानंतर परंपरेनुसार भाकीत वर्तवले की, यंदा देशात कुठेही दुष्काळ पडणार नाही आणि सुखसमृद्धी नांदेल.
उत्तरकाशी जिल्ह्यात यमुनोत्री धामला रविवारी सकाळीही परिस्थिती बिघडली होती. एकाच वेळी ९ हजार भाविक दाखल झाल्याने जानकी चट्टीपासून मंदिरापर्यंतचा ४ किमी लांबीच्या रस्त्यावर कोंडी झाली होती. अखेर भाविकांनी आता येऊ नये, असे आवाहन पोलिसांना करावे लागले. यात्रा एक दिवसासाठी स्थगित करण्याचीही योजना बनली परंतु नंतर ती बदलावी लागली. त्यानंतर भाविकांना ४५ किमी दूरवरील बरकोटलाच थांबवण्यात आले. त्यानंतर जानकी चट्टीला येण्यापूर्वी डामटा धारसू येथेही भाविकांना थांबण्यात आले. यामुळे १५ किमीपर्यंत कोंडी झाली होती. या महिला, मुले, वृद्धांचा समावेश होता.त्यांना बिस्किटे, फरसाण खाऊन सात तास वाट तिष्ठत बसावे लागले. त्यांनतर भाविकांना बर्नीगाड ते कुथनौर, पालीगाडमार्गे जानकी चट्टीला पाठवण्यात आले. सायंकाळी ५ वाजता यमुनोत्री मंदिरापासून जानकी चट्टीपर्यंतचा रस्ता मोकळा झाल्यावर भाविकांना पुढे पाठवण्यात आले.