तर ठिकठिकाणी आचारसंहितेचा भंग
हडपसर :शिरूर लोकसभा मतदार संघातील हडपसर विधानसभा क्षेत्रातील एका मतदान केंद्रात महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पोलिंग एजंट चक्क मतदान केंद्राच्या आत प्रचार साहित्य घेऊन बसल्याने शिरूर लोकसभा मतदारसंघात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित एजंट मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी गेलेल्या मतदारांना खानाखुणा करत असल्याचे लक्षात आल्याने, येथे उपस्थित असणाऱ्या काही निवृत्त लष्कर अधिकाऱ्यांनी याबाबत आवाज उठवल्याने हा प्रकार उघडकीस आला.
निवडणूक अधिकाऱ्यांचे कारवाईचे आदेश
याबाबत मतदान केंद्रावर उपस्थित असणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्यांची आणि पोलिसांची भूमिका देखील संसदेच्या भोवऱ्यात असून, याबाबत निवडणूक आयोगाने तातडीने दखल घेणे गरजेचे असल्याची मागणी सुज्ञ मतदारांकडून करण्यात येत आहे.यासोबतच मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या वोटिंग मशीन ज्या ठिकाणी ठेवण्यात आल्या होत्या त्या ठिकाणचे सीसीटीव्ही देखील तब्बल ४५ मिनिटे बंद असल्याचा धक्कादायक प्रकार देखील समोर आल्याने सबंध निवडणूक प्रक्रियेवरच मतदारांनी संशय व्यक्त केला असून; याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रारी करण्यात आले असून याबाबत निवडणूक आयोगाने तातडीने खुलासा करावा असं महाविकास आघाडीचे उमेदवार खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.
महायुतीकडून आचारसंहितेचा भंग : अनेक बुथवर घड्याळाच्या स्लीपांचे वाटप
अनेक बुथवर महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे निवडणूक चिन्ह असलेल्या घड्याळाच्या स्लीप वाटल्या जात असून, या प्रकाराने मतदार संघात एकच खळबळ उडाली आहे. या गैरप्रकराबाबत महाविकास आघाडीचे उमेदवार खा. डॉ. अमोल कोल्हे यांचे प्रतिनिधी निलेश मगर यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून, यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत.