मुंबई-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना थेट एनडीए सोबत येण्याची ऑफर दिली आहे. नंदुरबार मध्ये आयोजित सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत यावे, त्यांची सर्व स्वप्न पूर्ण होतील, असे मत व्यक्त केले आहे. याला आता शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ज्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही, त्यांच्यासोबत आम्ही कधीच जाणार नसल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. आतापर्यंत 3 टप्प्यातील मतदानाची परिस्थिती पाहता मोदी अस्वस्थ झाले आहेत. आणि याच अस्वस्थेतून नरेंद्र मोदी अशी वक्तव्ये करत असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.
आतापर्यंत लोकसभा निवडणुकीचे जे तीन टप्पे झाले आहेत, त्या टप्प्यात एकंदरीत मतदाराची स्थिती पाहता त्याच्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा विचार व्यक्त केला असावा, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. नरेंद्र मोदी यांच्या विचारांच्या विरोधात जनमत तयार झालेले दिसून येत आहे. त्यामुळे ते अस्वस्थ आहेत. आणि त्या अस्वास्थेतून ते असे विधाने करत असल्याचा आरोप आरोप शरद पवार यांनी केला आहे.
एखादा पक्ष असेल काँग्रेस असेल किंवा आणखी दुसरा कोणता एखादा पक्ष असेल. विचाराने आपल्या कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकांमध्ये ते जात असतात. ते लोकांचे प्रश्न मांडत असतात. लोकांच्या सुख दुःखावर लक्ष केंद्रित करत असतात. त्यांना नकली म्हणण्याचा अधिकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणी दिला? असा प्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केला आहे.
नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदावर आहेत, त्यांनी काही गोष्टींच्या बाबतीत तारतम्य पाळले पाहिजे. त्यांचे बोलणे अयोग्य असल्याचेही शरद पवार यांनी म्हटले आहे. पंतप्रधानपद हे एक इन्स्टिट्यूशन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अलीकडच्या काळातले भाषणे पाहिल्यानंतर असे वाटते की, या इन्स्टिट्यूशनची प्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाळली नाही. एकंदरीत त्यांच्या वक्तव्यांवरुन तरी तसे वाटत नसल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.