उज्वल निकमांवर गुन्हा दाखल केलाच पाहिजे-निवृत्त पोलीस अधिकारी मुश्रीफ

Date:

हेमंत करकरेंच्या शरीरारतील गोळ्या अतिरेक्यांच्या रायफलमधील नव्हत्या,हे कोर्टाच्या निकालातही नमूद आहे -मुश्रीफ

उज्ज्वल निकम यांनी जाणूनबुजून आरएसएसशी संबंधित ; त्या’पोलीस अधिकाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला

२६/११ च्या हल्ल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी ८ दिवस अगोदरच दिलेली होती , तरीही …

काँग्रेस नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शहीद पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. “हेमंत करकरे यांना लागलेली गोळी कसाबच्या बंदुकीतील नव्हती. तर ती गोळी आरएसएस समर्थक एका पोलीस अधिकाऱ्याच्या बंदुकीतील होती. त्यावेळी हे पुरावे लपवणारा देशद्रोही कोण असेल तर तो उज्ज्वल निकम आहे”, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांवर ज्येष्ठ सरकारी वकील आणि भाजपचे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिलीय. त्यांनी या आरोपांचं खंडन केलं आहे. विजय वडेट्टीवार यांनी माजी पोलीस अधिकारी एस. एम. मुश्रीफ यांनी लिहिलेल्या ‘हू किल्ड करकरे’ नावाच्या पुस्तकाचा दाखला देत आरोप केला आहे. यानंतर एस. एम. मुश्रीफ यांची प्रतिक्रिया TV9 मराठी या वाहिनीने प्रसारित केली आहे या वृत्तवाहिनीला एस. एम. मुश्रीफ यांनी याबाबत सविस्तर प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाले , एस एम मुश्रीफ …

“हू किल्ड करकरे हे पुस्तक 2009 मध्ये प्रकाशित झालं. त्यानंतर त्याच्या बऱ्याच प्रती निघाल्या. प्रती प्रसिद्ध झाल्या. पण नुकतंच उज्ज्वल निकम यांना भाजपची उमेदवारी मिळाल्यानंतर मला वाटतं आपण यावर काहीतरी निवेदन दिले पाहिजे. कारण ते या सगळ्या प्रकरणात सरकारी वकील होते. त्यांची बरीच जबाबदारी होती. एक सत्य लोकांसमोर आणायची जबाबदारी होती. ते सत्य मी या पुस्तकाच्या माध्यमातून लोकांसमोर आणलेलं होतं. या पुस्तकात मी मुख्यत्वे दोन मुद्दे मांडले होते”, अशी प्रतिक्रिया एस. एम. मुश्रीफ यांनी दिली.

“जजमेंटमध्ये म्हणजेच निकालामध्ये ही गोष्ट स्पष्टपणे नमूद केलेली आहे. त्याच निकालपत्रात पोस्टमार्टम रिपोर्टच्या आधारे हेही नमूद करण्यात आलं आहे की, त्यांना ज्या गोळ्या मारण्यात आल्या आहेत त्या मानेपासून पोटात खाली पाच गोळ्या मारण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्यांचा मृत्यू झालाय. याचा अर्थ पक्का झाला की, त्यांना पाच गोळ्या रिव्हॉलवरने मारल्या. त्यातील तीन बाहेर निघून गेल्या, दोन आतमध्येच राहिल्या. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला, असं एस. एम. मुश्रीफ म्हणाले.

“ही बाब उज्ज्वल निकम यांच्या लक्षात आली होती. कारण पोस्टमार्टम रिपोर्ट कागदपत्रात होता. निकालात ही बाब आली होती. उज्ज्वल निकम यांची जबाबदारी होती की, त्यांनी कोर्टाला विनंती करने की, तु्म्ही तपास यंत्रणांना आदेश द्या, ज्या गोळ्यांमुळे हेमंत करकरे यांचा मृत्यू झाला त्या कुणी मारल्या याचा तपास करणयाचे आदेश द्या, अशी त्यांची जबाबदारी होती. पण त्यांनी तशी विनंती त्यांनी कोर्टात केलेली नाही. किंवा त्यांनी ही बाब कुठेही रेकॉर्डवर आणली नाही. याचा अर्थ त्यांनी जाणूनबुजून या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला”, असा आरोप मुश्रीफ यांनी केला.

“आमचं जनरल नॉलेज आहे, या जनरल नॉलेजवरुन प्रभाकर आलोक आणि ज्यांनी वरुन खाली गोळ्या घातल्या ते पोलीस अधिकारी हे दोघेही आरएसएसशी संबंधित आहेत, अशी आम्हाला माहिती मिळाली. याचा अर्थ उज्ज्वल निकम यांनी आरएसएसच्या दोन लोकांना वाचवण्यासाठी, या सर्व हल्ल्यामागील जबाबदार असणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्तीला वाचवलं आणि करकरेंना मारणाऱ्या व्यक्तींना वाचवलं. हे देशद्रोही कृत्य आहे. त्यामुळे प्रभाकर आलोक, संजय गोयीलकर वरुन ज्यांनी गोळ्या मारल्या आहेत ते आणि उज्ज्वल निकम या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी आमची मागणी आहे”, अशी भूमिका एस एम मुश्रीफ यांनी मांडली.“ज्यावेळी माझं पुस्तक प्रसिद्ध झालं त्यावेळी बिहारचे आमदार राधाकांत यादव, त्यांचं त्यावेळी वय 77 वर्षे होतं. त्यांनी ते पुस्तक वाचलं. त्यानंतर त्यावेळी ते मला येऊन भेटले. ते म्हटले की, तुम्ही जे म्हणालात ते मला पटलेलं आहे. या गुन्हाचा फेरतपास व्हावा यासाठी जनहित याचिका दाखल करायची आहे. तर मी म्हटलं, ठीक आहे. तुम्हाला जे काही डॉक्यूमेंट्स लागतील ते मी देतो. त्याच्या आधारे त्यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केला. सुरुवातीला ती फक्त रिट पिटीशन होती. पण कोर्टाने स्वत: त्याचं रुपांतर जनहित याचिकेत केलं. ही याचिका दाखल झाल्यावर कोर्टाने ते बघितलं आणि हे बरोबर आहे, याच्या बोलण्यात तथ्य आहे, असं बघितलं. कोर्टाला जोपर्यंत तथ्य आहे असं वाटत नाही तोपर्यंत ते नोटीस काढत नाहीत”, असंदेखील एस एम मुश्रीफ यांनी सांगितलं.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शंभर टक्के फी माफीमुळे मुलींच्या तंत्रशिक्षणाला गती

‘लेक शिकली, प्रगती झाली’ ही केवळ एक म्हण नाही,...

जाहिरात माफियांच्या दबावापुढे नमले,होर्डींग्ज धोरण मागे घेतले

आपल्या जाहिरात व्यवसायावर परिणाम होईल म्हणून काही जाहिरात माफियांनी...

कात्रजच्या घाटात एसटी बस आणि ऑटो रिक्षा ची समोरासमोर धडक, रिक्षाचालक ठार

पुणे: पुण्यातील कात्रज घाट परिसरात गुरुवारी (दि. 23 एप्रिल...