Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

‘सुंदर ती दुसरी दुनिया’ ३ आणि १७ डिसेंबरला होणार महाबालनाट्याचा प्रयोग

Date:

सोशल मीडिया, इंटरनेट, रिल्सच्या युगात लहान मुले त्यांचे बालपण विसरत आहेत. मे महिन्यात मित्रमैत्रिणींसोबत दिवसभर हुंडाळणे, विटीदांडू, साखळीसाखळी असे अनेक खेळ तर हल्ली कालबाह्य झाले आहेत. हल्लीच्या लहान मुलांना या खेळांची नावही माहित नाहीत. स्पर्धेच्या नावाखाली मुलांची केवळ धावपळच सुरु आहे. या सगळ्यात मुलांची हिरावलेली निरागसता परत मिळवून बालपणात घेऊन जाणारे ‘सुंदर ती दुसरी दुनिया’ हे धमाल नाटक नाट्यरसिकांच्या भेटीला आले आहे. वेध थिएटर निर्मित, अपूर्वा प्रॉडक्शन प्रस्तुत या दोन अंकी महाबालनाट्यात ६० बालकलाकार आहेत. डॉ. समीर मोने लिखित या नाटकाची संकल्पना संकेत ओक यांची असून निर्मिती सुमुख वर्तक यांनी केली आहे तर टीम वेधने ‘सुंदर ती दुसरी दुनिया’चे दिग्दर्शन केले आहे.

नाटकाला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल सुमुख वर्तक म्हणतात, ” लहान मुलांसोबत मोठ्यांना सुद्धा त्यांच्या बालपणात घेऊन जाणारी ही कलाकृती असल्याने प्रत्येक पाल्याने, पालकांनी आणि नाट्यप्रेमींनी आवर्जून पाहावे, असे हे नाटक आहे. नाट्यगृहातून बाहेर पडताना प्रत्येक बालक एक सकारात्मक संदेश घेऊन निघेल. ठाणे, डोंबिवलीला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर आता हा प्रयोग ३ डिसेंबर रोजी बोरिवली येथील प्रबोधनकर ठाकरे नाट्यगृह आणि १७ डिसेंबर रोजी ठाणे येथील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात सकाळी अकरा वाजता होणार आहे. या नाटकात आणखीन एक वेगळा प्रयोग केला आहे, तो म्हणजे प्रत्येक प्रयोगागणिक या बालनाट्यात बालकलाकार वाढणार आहेत. १७ डिसेंबरच्या प्रयोगात १२० बालकलाकार रंगत आणणार आहेत. अनेकांनी या नाटकाबद्दल चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. पाल्यांपासून पालकांपर्यंत सर्वांनाच खुर्चीला खिळवून ठेवणारे हे नाटक मजा, मस्ती, धमाल करत सगळे एन्जॉय करत आहेत.”

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महाराष्ट्रात लहान मुले ,मुली अन जमिनीही पळविणाऱ्या टोळ्या -देवेन्द्रजी तुम्ही करत काय आहात ?

पुणे-महाराष्ट्रात लहान मुले ,मुली अन जमिनीही पळविणाऱ्या टोळ्या प्रचंड...

11 सरकारी रुग्णालयातून ‘बोगस’ औषधींचे वितरण:मंत्र्यांची कबुली

नागपूर:राज्यातील सरकारी आरोग्य संस्थांमध्ये बोगस औषधांचा पुरवठा आणि वापर...