पुणे – श्रीमद् राजचंद्रजी यांचे भक्त,आध्यात्मिक मार्गदर्शक,आणि आत्मज्ञानी गुरु व श्रीमद् राजचंद्र मिशन धरमपूरचे संस्थापक पूज्य गुरुदेवश्री राकेशजी यांच्या परिवर्तनकारी सत्संगाचे आयोजन येत्या दि.२० आणि २१ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे.स्वारगेट येथील श्री गणेश कला क्रीडामंच येथे रात्री ८ ते १० या कालावधीत होणार आहे.
युवकांचे प्रेरणास्थान म्हणून ओळखले जाणारे पूज्य गुरुदेवश्री राकेशजी हे जगातील सुमारे ९६ युवक केंद्रामधून सत्संग,साधना,सेवा,संस्कृती, आणि क्रीडा या क्षेत्राच्या माध्यमातून युवकांना उच्च ध्येय गाठण्यासाठी मार्गदर्शन करीत आहेत.तसेच श्रीमद् राजचंद्र डिव्हाईन टच या देश विदेशातील २५२ केंद्रांच्या माध्यमातून बालमनावर संस्कार करण्याचे कार्य करीत आहेत. मुख्य म्हणजे श्रीमद् राजचंद्र मिशन धरमपूर संस्था जगातील २०६ केद्राच्या माध्यमातून कार्यरत आहे.
पूज्य गुरुदेवश्री राकेशजी हे जगातील अभ्यासकांना
धर्मयात्रांच्या माध्यमातून दर्शन, अनुभूती आणि माहिती याचा लाभ देत आहेत.तसेच धर्मयात्रे दरम्यान साधक यांना ते सत्संग , साधना,प्रतिष्ठा,पदार्पण आदि माध्यमातून मार्गदर्शन करीत आहेत.भावनिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यावर सत्संगाचा सकारात्मक प्रभाव अनुभवण्यासाठी सर्वांनी दोन दिवसीय कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे अशी विनंती आयोजकांनी केली आहे.

