विशेष फुटपाथ दुरुस्ती अभियानाचे उद्घाटन

Date:

क्षेत्रीय कार्यालयांमध्ये ‘जागल्या’ संकल्पना राबविण्यात येणार
पुणे- पुणे महानगरपालिका पथ विभागामार्फत प्रभाग१२, लकाकी रोड, मॉडेल कॉलनी येथे विशेष फुटपाथ दुरुस्ती अभियानाचा शुभारंभकरण्यात आला . छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे, महापौर मंजुषा नागपुरे, सभागृह नेते गणेश बिडकर, मा. महापालिका आयुक्त नवल किशोर राम व प्रभागातील स्थानिक नगरसेवक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पुणे महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सदर अभियानाच्या अंतर्गत फुटपाथवर असलेले विद्युत खांब, फलक, डीपी बॉक्स इत्यादी अडथळे फुटपाथच्या कडेस घेण्यात येणार आहे. फुटपाथ पादचाऱ्यांकरिता समतल करण्यात येणार आहे.
तसेच सदर अभियानाअंतर्गत शिवाजीनगर परिसरातील लकाकी रोड, थोरात चौक ते वेताळबाबा चौक हे दोन रस्ते प्राधान्याने हाती घेतलेले आहेत. या दोन्ही रस्त्याची अंदाजित लांबी १४०० मीटर इतकी असुन, या दोन्ही रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या अस्तित्वातील पदपथाची योग्य प्रकारे दुरूस्ती करून सदरचे पदपथ आदर्शरित्या विकसित करण्यात येतील व त्यानंतर त्या धर्तीवर संपुर्ण पुणे शहरात सदरचे फुटपाथ दुरूस्ती अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानामुळे नागरिकांकरिता उत्तम दर्जाचे व समपातळीत असणारे फुटपाथ कोणत्याही अडथळ्या शिवाय वापरणे शक्य होणार आहे.
फुटपाथ दुरुस्ती अभियानाचे उद्घाटन करताना महापौर सौ. मंजुषा दीपक नागपुरे यांनी महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘जागल्या’ या संकल्पनेची माहिती दिली. ‘जागल्या’ या संकल्पनेच्या अंतर्गत सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये ‘जागल्या’ कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहे. सदर कर्मचाऱ्याने आपल्या कार्यक्षेत्रात रोज एक ते दोन तास पायी चालून परिसरातील फुटपाथवर असलेल्या अडथळ्यांच्या नोंदी, आवश्यक दुरूस्ती इत्यादी माहिती घेऊन संबंधित अधिकाऱ्याला माहिती सादर करावयाची आहे. त्यानुसार पदपथावरील अडथळे दूर करून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील. विशेष फुटपाथ दुरुस्ती अभियान आणि ‘जागल्या’ संकल्पनेमुळे पादचाऱ्यांना चालणे सुलभ होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

युद्ध थांबले,इराण-अमेरिका 2 आठवड्यांसाठी युद्धविराम

इराण आणि अमेरिका 2 आठवड्यांच्या युद्धविरामावर सहमत झाले आहेत....

बेकायदा केबलमुळे निवृत्त ACP चा टिळक रोडवर अपघात -वर्षानंतर महापालिकेच्या विरोधात आरोपपत्र दाखल

पुणे- एकीकडे स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी पुणेकरांच्या...

अमली पदार्थांविरोधात जनचळवळ उभारणे लोकप्रतिनिधींची जबाबदारी : सभागृह नेते गणेश बिडकर

पुणे महानगरपालिका आणि पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या अमली पदार्थ...

विमाननगर मधील हुक्का पार्लरवर छापा

पुणे- विमाननगर मधील हुक्का पार्लरवर छापा मारून पुणे पोलिसांनी...