महापौर मंजुषा नागपुरे, धीरज घाटे आणि दुष्यंत मोहोळ यांच्यावर गुन्हे दाखल का केले नाही? काँग्रेसचा सवाल

Date:

पुणे:
भारतीय जनता पक्षाने पुण्याच्या शांतताप्रिय संस्कृतीला काळिमा फासण्याचे काम केले आहे. काँग्रेस भवनासमोर तथाकथित आंदोलनाच्या नावाखाली भाजप कार्यकर्त्यांनी जो हिंसाचार केला, तो अत्यंत निंदनीय आहे. या हिंसेला खतपाणी घालणारे पुणे भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, महापौर मंजुषा नागपुरे आणि युवा मोर्चा अध्यक्ष दुष्यंत मोहोळ यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल करण्याची मागणी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने केली आहे.काँग्रेसचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत पुढील रणनीती ठरवण्यात आली. यावेळी पोलिसांनी जाणूनबुजून आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेत्यांनी केला. तसेच, कालच्या आंदोलनात महापौर मंजुषा नागपुरे यांनी चिथावणीखोर भाषण केले असतानाही त्यांच्याविरोधात गुन्हा का दाखल झाला नाही, असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे. गुन्हा नोंदवण्यासाठी पोलिसांनी वेळ लावल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे. पुणे पोलिसांच्या भूमिकेविरोधात काँग्रेस उच्च न्यायालयात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कॉंग्रेसच्या प्रसिद्धी पत्रकातील मुख्य मुद्दे:

  • पूर्वनियोजित कट: भाजपचे कालचे आंदोलन हे लोकशाही मार्गाने नसून हिंसक उद्देशाने आखलेले होते. भाजप कार्यकर्त्यांनी स्वतःसोबत दगड आणले होते, याचे व्हिडिओ पुरावे समोर आले आहेत.
  • चिथावणीखोर नेतृत्व: पुण्याच्या प्रथम नागरिक असलेल्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी संयम राखण्याऐवजी आंदोलनात सहभागी होऊन कार्यकर्त्यांना चिथावणी दिली. तसेच धीरज घाटे आणि दुष्यंत मोहोळ यांनी आपल्या प्रक्षोभक भाषणांद्वारे कार्यकर्त्यांना काँग्रेस भवनावर हल्ला करण्यास प्रवृत्त केले.
  • दगडफेकीचा खोटा बनाव: स्वतःच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक करायची आणि त्याचे खापर काँग्रेसवर फोडायचे, हा भाजपचा ‘इव्हेंट’ फ्लॉप झाला आहे. काँग्रेस भवनाच्या आवारात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजप गुंडांनीच गोंधळ घातला आणि पत्रकारांनाही इजा पोहोचवली.

शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी सांगितले की, काँग्रेस पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या बदलीची मागणी करणार आहे. हा मोर्चा लवकरच पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून काढण्यात येणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे देखील या मोर्चात सहभागी होणार आहेत.

या घटनेबाबत प्रशांत जगताप म्हणाले की, काँग्रेस भवन परिसरातील घटना दुर्दैवी असून, त्यातून भाजप राजकीय दहशतवाद माजवत असल्याचे दिसते. पुणे पोलिसांनी पक्षपातीपणा केला आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांना का अडवले नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मुख्य रस्ता दोन तास अडवल्याने आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले.

जगताप यांनी सांगितले की, त्यांना मिळालेल्या एफआयआर कॉपीमधून महापौरांचे नाव वगळण्यात आले आहे. त्यांच्या प्रक्षोभक भाषणामुळे आंदोलनाला हिंसक वळण मिळाले होते. महापौरांचे नाव वगळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दबाव टाकला का, असा प्रश्नही जगताप यांनी विचारला. मुंबई उच्च न्यायालयात सर्व पुरावे घेऊन दाद मागणार असून, आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचेही ते म्हणाले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये मंजुषा नागपुरे आंदोलनात उपस्थित असल्याचे दिसत आहे, असेही जगताप यांनी नमूद केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

प्रजित नायर आज अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट), पदाचा पदभार स्वीकारला.

पुणे- आज पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट) या पदाचा...

ड्रेनेज विभागातील हजारो कोटींच्या खर्चाची चौकशी करा:महापौरांकडे नैमित्तिक समिती स्थापनेची भाजपच्या माजी नगरसेवकांची मागणी

पुणे- महानगरपालिकेच्या ड्रेनेज विभागामार्फत गेल्या चार वर्षांत झालेल्या हजारो...