पुणे : पुणे मेट्रो (Pune Metro) पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीतील अधिकाऱ्याने मंडळाची गणेश मूर्ती खरेदी करण्यासाठी दोन लाख रुपयांची वर्गणी देण्यास नकार दिल्याने बांबू व फावड्याने बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना डेक्कन जिमखाना भागात घडली आहे. याप्रकरणी एकावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शरद हरीभाऊ उगले (वय-62 रा. सोमेश्वर वाडी रोड, पाषाण, पुणे) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी श्रीकांत संतोष मरळ याच्यावर आयपीसी 384, 324 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.30 नोव्हेंबर) घडला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जंगली महाराज रोड लगत झेड ब्रीज येथील खाऊ गल्लीत
मेट्रो स्थानकाकडे जाणाऱ्या पादचारी पुलाचे काँक्रीटचे काम सुरु आहे. या पुलाचे काम एका ठेकेदार कंपनीकडून केले
जात आहे. गणेश उत्सवातमंडळाची गणेश मूर्ती घेण्यासाठी आरोपीने पुलाचे काम करणाऱ्याअधिकाऱ्याकडे दोन लाख रुपये मागितले होते. मात्र त्यांनी पैसे दिले नाहीत. यामुळे चिडलेल्या मरळ याने फिर्यादीयांच्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना लाकडे दांडके असलेल्या फावड्याने मारहाण करुन जखमी केले.पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक निकुंभ करीत आहेत.