पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी आज सकाळी ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार नाना नवले यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी नाना नवले यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा देत अजितदादांच्या कामाचं कौतुक केलं. तसेच आपले आशिर्वाद कायम पाठीशी असल्याचं सांगितलं..
आज सकाळी सुनेत्रा पवार यांनी पुण्यात नाना नवले व त्यांच्या कुटुंबियांची सदिच्छा भेट घेतली.या भेटीवेळी नाना नवले यांनी माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्याशी असलेल्या ऋणानुबंधाबद्दल माहिती दिली.याचवेळी त्यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. अजितदादांच्या माध्यमातून वेळोवेळी झालेल्या सहकार्याबद्दल सांगत त्यांच्या कामाचं नाना नवले यांनी कौतुक केलं.. माझे आशिर्वाद कायम तुमच्या पाठिशी राहतील असंही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितलं. तसेच संत तुकाराम कारखान्याच्या संचालक मंडळाचा पाठिंबा असल्याचंही त्यांनी नमूद केलं..
यावेळी नवले कुटुंबियांनी अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात सुनेत्रा पवार यांचं स्वागत झाले.यावेळी संत तुकाराम कारखान्याचे व्हाईस चेअरमन बापूसाहेब भेगडे, संचालक अनिल लोखंडे, ज्ञानेश नवले, चेतन भुजबळ, बाळासाहेब बावकर, सुभाष राक्षे, सुभाष जाधव, मधुकर भोंडवे, सखाराम गायकवाड, नरेंद्र ठाकर, ताराबाई सोनवणे, शुभांगी गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते .