~वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी पुणे, नागपूर,
कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद आणि विदर्भात काम सुरू ~
पुणे, 03 एप्रिल 2024 : अपर्णा एंटरप्रायझेस लिमिटेड (AEL) ही भारतातील सर्वात वेगाने वाढणारी बांधकाम साहित्य उत्पादक कंपनी असून, कंपनीने महाराष्ट्राच्या बाजारपेठेत प्रिमियम ॲल्युमिनियम विंडो आणि डोअर ब्रँड अल्टेझाच्या प्रवेशाची घोषणा केली. पुण्यापासून सुरुवात करून, कंपनीने नागपूर, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद आणि विदर्भ यांसारख्या प्रमुख शहरांना लक्ष्य करण्यासह राज्यभर आपला विस्तार करण्याची योजना आखली आहे. त्याच्या कार्याच्या पहिल्या वर्षात, राज्यातील 5% बाजारपेठेचा हिस्सा मिळवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.
महाराष्ट्रात ॲल्युमिनियमच्या खिडक्या आणि दरवाजांची बाजारपेठ 600 कोटी रुपयांहून अधिक असल्याचा अंदाज आहे. राष्ट्रीय चक्रवाढ वार्षिक वाढीचा दर (CAGR) 20% पेक्षा हे प्रमाण जास्त आहे. एक प्रमुख आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून प्रसिद्ध असलेल्यामध्ये पुणे येथे यात राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त वाढ होत आहे. ही वाढ विविध घटकांमुळे वाढली आहे, ज्यात उच्च मालमत्ता व्यक्तींच्या (HNIs) संख्येत लक्षणीय वाढ होण्याबरोबरच ॲल्युमिनियम खिडक्या आणि दरवाजांच्या फायद्यांना महत्त्व देणाऱ्या विवेकी ग्राहकांच्या वाढत्या लोकसंख्येचा समावेश आहे. ही क्षमता ओळखून अल्टेझाने महाराष्ट्रात लाँच करण्यासाठी पुण्याची धोरणात्मकदृष्ट्यानिवड केली आहे.
अपर्णा एंटरप्रायझेस लिमिटेडच्या कार्यकारी संचालक अपर्णा रेड्डी यांनी सांगितले की, “भारताच्या पश्चिम भागात रिअल इस्टेट आणि पायाभूत सुविधांच्या गरजा वाढल्याने टिकाऊ आणि प्रीमियम दर्जाच्या उत्पादनांची मागणी वाढली आहे. आमच्या प्रिमियम ब्रँड अल्टेझाद्वारे ॲल्युमिनियमच्या खिडक्या आणि दरवाजांच्या बाजारपेठेतील आमच्या प्रस्थापित कौशल्यासह, आम्ही झपाट्याने वाढणाऱ्या सेगमेंटचा फायदा घेण्यासाठी आणि विवेकी ग्राहकांना दर्जेदार समाधाने देण्यासाठी सज्ज आहोत. महाराष्ट्रातील आमचा विस्तार हा एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड आहे कारण यामुळे आम्हाला राज्यातील अनेक ठिकाणे तसेच पश्चिम विभागातील मोठ्या विस्ताराची दारे खुली झाली आहेत.”
अल्टेझाचे (AEL) प्रमुख श्री अमर देशपांडे यावेळी बोलताना म्हणाले की, “आम्ही पुण्यात अल्टेझा लाँच करण्यास उत्सुक आहोत आणि महाराष्ट्रातील ग्राहकांना आमची ॲल्युमिनियम खिडक्या आणि दरवाजांची अभिनव श्रेणी ऑफर करण्यास उत्सुक आहोत. आमचे अद्वितीय सामर्थ्य टर्नकी आधारावर प्रकल्प कार्यान्वित करण्याच्या आमच्या क्षमतेमध्ये आहे. यामध्ये डिझाइन, फॅब्रिकेशन आणि इंस्टॉलेशन यांचा समावेश आहे. त्यामुळे उच्च दर्जाची मानके राखून आमच्या क्लायंटसाठी अखंड आणि त्रास-मुक्त अनुभव मिळेल याची खात्री आहे. याव्यतिरिक्त ग्राहकांना समाधान मिळावे आणि त्यांना ब्रँड लक्षात राहावा यासाठी आमचा D2C दृष्टीकोन आहे.
भारतातील भारतीय ॲल्युमिनियम खिडक्या आणि दरवाजांची बाजारपेठ प्रामुख्याने बांधकाम आणि रिअल इस्टेट क्षेत्रांद्वारे चालविली जाते. या क्षेत्रात ऊर्जा-कार्यक्षम आणि सौंदर्यदृष्ट्या सुखकारक इमारत घटकांची वाढती मागणी आहे. परवडणारी घरे आणि शहरी विकासाला चालना देण्यासाठी सरकारच्या पुढाकारांमुळे याला गती आली आहे. 2019 मध्ये अपर्णा एंटरप्रायझेस लि. मध्ये एक विभाग म्हणून सुरू झालेली अल्टेझा सध्या पश्चिम आणि मध्य भारतातील निवडक ठिकाणांव्यतिरिक्त दक्षिण भारतातील सर्व प्रमुख शहरांमध्ये उपस्थित आहे आणि महाराष्ट्रातील ॲल्युमिनियम खिडक्या आणि दरवाजांच्या बाजारपेठेतील अग्रगण्य ब्रँड बनण्यास तयार आहे.