उच्च शिक्षण मंत्रालय आणि भारतीय विश्वविद्यालय संघ यांच्यावतीने राष्ट्रीय युवा महोत्सव
पुणे : राष्ट्रीय युवा महोत्सवात भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत विविध पारितोषिके पटकावली. लुधियाना मधील पंजाब शेतकी विश्विविद्यालय येथे उच्च शिक्षण मंत्रालय आणि भारतीय विश्वविद्यालय संघ यांच्यावतीने राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय युवा महोत्सवात १२० विद्यापीठांनी, २७ प्रकारच्या स्पर्धेत भाग घेतला होता.
महोत्सवात भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी २ सुवर्ण पदके आणि २ रौप्य पदके पटकाविली. सांघिक लोक वाद्यवृंद स्पर्धेत सुवर्ण पदक आणि शास्त्रीय तालवाद्य स्पर्धेत सुर्यकांत शिंदे याला सुवर्ण पदक मिळाले. सांघिक लोकनृत्य स्पर्धेत रौप्य पदक व सुगम संगीतात नंदिनी गायकवाड हिने रौप्यपदक पटकावले. शेवटच्या दिवशी पारितोषिक वितरण समारंभात भारतीय विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा वाद्यवृंदाचा विशेष कार्यक्रम सादर झाला.
या विद्यार्थांना भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे संचालक प्रा. शारंगधर साठे, देविका बोरठाकूर, प्रवीण कासलीकर, दीपक बिडकर यांचे मार्गदर्शन लाभले. भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे संचालक प्रा. शारंगधर साठे या महोत्सवात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन आणि मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते.
कुलगुरू प्रा. डॉ शिवाजीराव कदम, भारती विद्यापीठ संस्थेचे कार्यवाह आणि प्र – कुलगुरू डॉ. विश्वजीत कदम, कुलगुरू डॉ. विवेक सावजी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.