पुणे- आज दि. ३० मार्च २०२४ रोजी जेष्ठ पत्रकार आणि लढाऊ कार्यकर्ते लेखक निरंजन टकले यांनी काँग्रेस भवनला भेट दिली. यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी, शिवसेनेचे गजानन थरकुडे, संजय मोरे, संग्राम खोपडे उपस्थित होते.
भारत जोडो अभियानचे समन्वयक प्रशांत कोठाडिया यांनी या बैठकीचे आयोजन केले व संदिप बर्वे, ॲड. संदिप ताम्हणकर आणि भारत जोडो अभियानचे इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी निरंजन टकले यांनी नाशिक शहरात केलेले वेगवेगळे उपक्रम, बुथ कार्यकर्ता प्रशिक्षण, कोपरा सभा कार्यकर्ता प्रशिक्षण, ६००० सोशल मिडिया वॉरीयर यांची टिम बांधणे याचे अनुभव सांगितले. तसेच भाजपा, संघ आणि मोदी सरकारचा खोटा प्रचार प्रत्येक ठिकाणी खोडून काढण्याची रणनिती विषद केली.
यानंतर शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘पुण्यात महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी निरंजन टकले यांचा एक तपशिलवार प्रशिक्षण कार्यक्रम घेतला जाईल आणि पुण्यातही अशीच टिम उभी केली जाईल असे नियोजन आहे असे सांगितले.’’
सर्व उपस्थितांचे आभार मानून निरंजन टकले यांचा शाल आणि तिरंगी पट्टी देऊन स्वागतपर सत्कार केला.