पुणे-काल आमदार रवींद्र धंगेकर यांनी आयुक्त विक्रम कुमार यांच्या कारकीर्दीवर आरोप करत बंगल्यावर ठिय्या मांडल्यावर आज त्यांची शासनाने बदली करून त्यांच्या जागेवर राजेंद्र भोसले यांची नियुक्ती केली आहे.विक्रमकुमार यांची अतिरिक्त महानगर आयुक्त, MMRDA, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.२००८ साली आय ए एस झालेले राजेंद्र भोसले यांनी यापूर्वी पुणे विभागीय आयुक्तालयात अतिरिक्त विभागीय आयुक्त म्हणून काम केलेले आहे .सांगली जिल्हापरिषद, सोलापूर जिल्हाधिकारी, कल्याण येथे msedcl मध्ये सहसंचालक,मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी, म्हणून काम केलेले आहे.
जुलाई २०२० पासून विक्रमकुमार यांच्याकडे पुणे महापालिका आयुक्तपदाची सूत्रे देण्यात आली होती .कोविड-19 साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे शहरात कडक लॉकडाऊन पुन्हा सुरू करण्याबाबत तत्कालीन आयुक्त शेखर गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर, राज्य सरकारने शनिवारी अचानकपणे गायकवाड यांची बदली केली. गायकवाड जेमतेम सहा महिने आयुक्त होते सुरुवातीला त्यांनी केलेल्या प्रतिबंधात्मक उपायांसाठी प्रशंसा झाली होती परंतु नंतर काही लोकप्रतिनिधींच्याकडून ते विश्वासात घेत नाहीत असा आक्षेप घेतला गेला , त्यामुळे तात्काळ त्यांची बदली करून विक्रम कुमार यांना आणण्यात आले होते. विक्रम कुमार मार्च 2019 पासून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) चे महानगर आयुक्त होते. कुमार (43) हे PMC आयुक्त बनलेल्या सर्वात तरुण नोकरशहांपैकी एक आहेत. त्यांच्याकडे आर्किटेक्टची पदवी आहे आणि ते भारतीय प्रशासकीय सेवेच्या (IAS) 2004 च्या बॅचचे आहेत.पीएमआरडीएमध्ये काम करण्यापूर्वी कुमार यांनी मुंबईत महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मुंबईतील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) येथे सह मुख्य कार्यकारी अधिकारी, औरंगाबादचे जिल्हाधिकारी, मीरा भाईंदर महापालिकेचे आयुक्त, सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे. वाशिम, चंद्रपूर आणि अकोला येथे विविध पदांवर पुण्यात येण्यापूर्वी काम केले होते.
या अधिकाऱ्यांची झाली बदली
- विक्रम कुमार (IAS:MH:2004) महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका, पुणे यांची अतिरिक्त महानगर आयुक्त, MMRDA, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- डॉ. राजेंद्र भोसले (IAS:MH:2008) यांची महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- लहू माळी (IAS:MH:2009) यांची संचालक, आपत्ती व्यवस्थापन, R&FD, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- कैलाश पगारे (IAS:MH:2010) व्यवस्थापकीय संचालक, M.S. कापूस उत्पादक विपणन महासंघ, मुंबई यांची एकात्मिक आदिवासी विकास योजना, नवी मुंबई या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.