पुणे: कसबा पेठेतील छोटा शेख सल्लाह दर्गा परिसरात असलेल्या मस्जिदच्या अनधिकृत बांधकामाबाबत पुणे महानगरपालिका करणार असलेल्या कारवाईबाबत चुकीची माहिती देवुन (अफवा पसरवून) मुस्लिम समाजाकडून अपराध घडवा या हेतूने चिथावणी देवून दोन समाजामध्ये शत्रुत्व व तेढ निर्माण होईल अशी कृती करून गैरकायदेशीर जमाव जमविल्याप्रकरणी 21 जणांसह इतरांविरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलीस हवालदार प्रमोद लालासाहेब जगताप (वय-44) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून शाकीर शेख, मुदस्सर शेख, ताजुद्दीन शेख, इब्राहीम अतार (रा. कसबा पेठ), मुनाफ पटेल (रा. कोंढा), मोईद्दीन सय्यद (रा. पर्वती दर्शन), अस्लम पटेल (रा. कोंढवा), दाऊद शेख (रा. कसबा पेठ), रहिमुद्दीन शेख, जाकीर शेख (रा. मंगळवार पेठ), अन्वर शेख (रा. कसबा पेठ), सलीम मौला पटेल (रा. भिमपुरा कॅम्प), नदीम मुजावर, मतीन अब्दुलरहीम सय्यद (रा. कोंढवा), राहील अब्दुल रहीम सय्यद (रा. कोंढवा), तौफिक रहिमुद्दीन शेख (रा. कसबा पेठ), अहमद सय्यद (रा. भवानी पेठ), रमीज रज्जाक शेख (रा. शिवाजीनगर, जुना तोफखाना), साजीद खान पठाण (रा. लोणार आळी, रविवार पेठ), जाहिद शेख (रा. कोंढवा) यांच्यासह इतरांवर आयपीसी 143, 145, 149, 117, 153/अ, 341 सह महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
छोटा शेख सल्लाह दर्गा परिसरातील असलेल्या मस्जिदच्या अनधिकृत बांधकामाबाबत पुणे महानगरपालिका करणार असलेल्या कारवाईबाबत चुकीची अफवा शुक्रवारी रात्री पसरवण्यात आली. यानंतर चार ते पाच हजार मुस्लिम बांधव परिसरात जमले. समाजमाध्यमातून अफवा पसरल्यानंतर तणाव निर्माण झाला. त्यामुळे या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. समाजमाध्यमातून अफवा पसरवणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे अजित जाधव करीत आहेत.घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त प्रविण पवार,
अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल्ल,
विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, सहायक पोलीस आयुक्त फरासखाना विभाग रुक्मिणी गलांडे,
फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजित जाधव,
सहायक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक प्रतिक्षा शेंडगे यांनी घटनास्थळाला भेट दिली होती.