सागर बंगल्यांवर पोहचण्यापूर्वी त्यांना आमची भींत भेदावी लागेल…
मुंबई- भाजप आमदार नितेश राणे यांनी देखील मनोज जरांगे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. मराठा आरक्षणाचे लढणारे नेते मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सनसनाटी आरोप केल्यानंतर भारतीय जनता पक्षातले नेते संतप्त झाले आहेत. अंतरवाली सराटीहून सागर बंगल्याच्या दिशेने निघालेल्या मनोज जरांगे यांच्यावर भाजप आमदार नितेश राणे आणि प्रसाद लाड यांनी पलटवार केला आहे. तुम्ही सागर बंगल्यावर येणार आणि आम्ही काय गप्प बसणार काय? सागर बंगल्याआधी आमची एक भिंत आहे, आधी ती भिंत पार करा, असं आव्हानच आमदार नितेश राणे यांनी दिलं आहेमुळात जरांगे हे केवळ देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत आहेत. मुळात त्यांच्या मनात हा द्वेष का निर्माण झाला आहे. अन्य नेत्यांचे नाव का घेत नाही. उद्धव ठाकरे किंवा शरद पवार,राहुल गांधी यांचे नावे का घेत नाही, असा आरोप देखील नीतेश राणे यांनी केला आहे.
मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करु नये, असं राणे म्हणाले. मनोज जरांगे यांनी सागर बंगल्यावर यायचा इशारा दिल्यानंतर आम्हाला देखील भिंत म्हणून बाहेर उभं राहावं, लागेल, असं राणे म्हणाले.आंदोलन कशासाठी, फडणवीस साहेबांच्या नावाने राजकारण करण्याचे आहे. मराठा समाजाचे हित राहिले बाजूला त्यासाठी सरकार प्रयत्न करतेय. जरांगे यांनी लक्षात ठेवावे आम्ही देखील मराठे आहोत, तुम्हाला सागर बंगल्यांला पोहचण्यापूर्वी त्यांना आमची भींत भेदावी लागेल.