पुणे-राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख व आमदार शशिकांत शिंदे यांनीही शरद पवार काँग्रेसमध्ये विलीन होण्याची चर्चा फेटाळून लावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या बातम्यांमध्ये सत्यता नाही. आम्ही स्वतंत्र चिन्ह घेऊन लढण्याचा तयारीत आहोत. महाविकास आघाडीकडून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून लढणार आहोत, असे अनिल देशमुख यांनी सांगितले. तर शिंदे यांनी आमच्या पक्षाच्या विलीनीकरणाच्या बातम्या कोण पेरत आहे? त्याचा शोध घेण्याचे आवाहन केले. राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र राहील. पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या बातम्या निरर्थक आहेत, असे सुप्रिया सुळे यांनी हि स्पष्ट केले आहे.