मुंबई- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा 15 तारखेला होणारा छत्रपती संभाजीनगर, जळगाव दौरा रद्द झाला आहे. हा दौरा पुढे ढकलण्यात आला असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्रातील अकोला, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर येथे राज्यातील 15 लोकसभा मतदारसंघांतील तयारीचा आढावा यांच्याकडून घेण्यात येणार होते. या दौऱ्यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह इतर काही महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार होते. मात्र, हा दौरा रद्द करण्यात आलाय.
शेतकरी मोर्चामुळे रद्द झाला दौरा
दिल्लीवर चालू येत असलेल्या राजस्थान, पंजाबमधील शेतकऱ्यांच्या मोर्चामुळे केंद्रीय गृहमंत्री यांनी आपला गुजरात दौरा रद्द केला. त्यापाठोपाठ त्यांनी महाराष्ट्र दौरा देखील रद्द केला असल्याची माहिती वरिष्ठ सुत्रांकडून दिली जात आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी छत्रपती संभाजीनगरात 16 सप्टेंबरला रोजी येणार होते. मात्र अमित शाहांचा हा औरंगाबाद दौरा आता रद्द झाला आहे. 17 सप्टेंबर रोजी अमित शाह यांचे वेळेचं नियोजन होत नसल्यामुळे, हा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती.
विशेष म्हणजे अमित शाह त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान जळगाव जिल्ह्यातील कार्यक्रमातही हजेरी लावणार होते. जळगावत युवा संमेलन कार्यक्रमासाठी भाजपचे नेते तथा केंद्रीय मंत्री अमित शहा यांची उपस्थिती राहणार होती. अमित शाह यांचा 15 फेब्रुवारीला जळगाव जिल्ह्याचा दौरा होता. मात्र अमित शाह यांचा हा जळगाव जिल्ह्याचा दौरा रद्द झाला आहे. खाजगी कारणांमुळे हा दौरा रद्द झाला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. अमित शाह यांचा दौरा स्थगित झाल्याच्या बातमीला जिल्हा प्रशासनाने सुद्धा दुजोरा दिलेला आहे.