२४ तासाच्या आत पोलिसांनी पकडले
पुणे- तळजाई पठार धनकवडी,येथे घरी निघालेल्या झोमॅटो वाल्या तरुणाला तंबाखूच्या बहाण्याने रोखून लुटल्याच्या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. १) शंतनु मारूती लोहार, वय १९ वर्षे रा. दुर्वाकुंर सोसायटी, प्रभात चौक धनकवडी पुणे २) मंगेश ऊर्फ मंग्या हनुमंत चौरे, वय २१ वर्षे रा.नवनाथ नगर, धनकवडी, पुणे ३. अविष्कार ऊर्फ अव्या अशोक दिघे, वय २२ वर्षे रा. रामदेव हाईट्स, गुलाबनगर धनकवडी, पुणे अशी या तीन आरोपींची नावे आहेत. दि.०९/०२/२०२४ रोजी रात्रौ ००/३० वा. स.नं.३६/२ अम्बोस स्कुल जवळ नवनाथनगर धनकवडी पुणे येथे सार्वजनीक रोडवर हा प्रकार घडला. या तिघा आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी तरुणाला यांना मागितली .त्यावेळी फिर्यादी यांनी मी तंबाखु खात नसल्याचे सांगितल्याचे कारणावरून, त्यांनी फिर्यादी यांना हाताने मारहाण करून, लाईटच्या ट्युबची नळी त्यांचे हातावर मारून, त्यांना जखमी करून त्यांचेकडील ७,०००/- रु किचा मोबाईल फोन जबरी चोरी करून नेला आहे.याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक महेश नलावडे ९४०४४०५१९६ अधिक तपास करत आहेत.