पुणे– आर्थिक कारणावरून एका सराफी व्यावसायिकाने आपल्या दुकानमालकावर भर चौकात गोळी झाडली . त्यानंतर रिक्षातून पोलिस ठाण्यात जाताना स्वत: वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. दुकानमालक गंभीर जखमी झालेअसून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. अनिल सखाराम ढमाले(५२, रा. बालेवाडी) असेआत्महत्या केलेल्याचे नाव आहे. आकाश गजानन जाधव (वय ३९, रा. बाणेर) असे जखमी झालेल्या दुकानमालकाचे नाव आहे. ही घटना बाणेर येथील कळमकर पार्क लेनमध्ये शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,अनिल ढमाले हे सराफ व्यावसायिकआहेत. जाधव यांचे बाणेर येथील हाय स्ट्रीटवर दुकान आहे. जाधव यांनी ढमाले यांना १४ वर्षांपासून दुकान भाड्याने दिले आहे. अनिल ज्वेलर्स म्हणून हे दुकान ढमाले चालवत होते. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात आर्थिक वादसुरू होता. ढमाले याने जाधव यांना चहा घेण्यासाठी घरातून खाली बालावले. घराजवळील कळमकरपार्क लेन नं.१ येथे ते दुचाकीवरूनयेताना मागे बसलेल्या ढमालेने जाधव यांच्या डोक्यात पिस्तुलातून गोळी झाडली. त्यामुळे दोघेही रस्त्यावर पडले.
ढमाले याने एक रिक्षा केली व रिक्षाचालक सतीश यादव याला रिक्षा चतु:श्रृंगी पोलिस ठाण्याकडे घेण्यास सांगितले. औंध येथील भाले चौकात रिक्षा आली असताना त्याने रिक्षाचालकाला मला पाणीघेऊन ये, असे सांगितले. यादव हे पाणी आणायला गेले. तेवढ्यात ढमाले याने स्वत:वर गोळीबारकरून आत्महत्या केली.रिक्षामध्येच त्याचा मृत्यु झाला.दरम्यान, आकाश जाधव यांच्यावर ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. पोलीस निरिक्षक (गुन्हे) अंकुश चिंतामण ९०४९२७७९६६ अधिक तपास करत आहेत .