पुणे-कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या पत्नीला धमकवणारा आरोपी ससून रुग्णालयातून पळाला आहे. पोलिसांना गुंगारा देत ससून हॉस्पिटल येथूल पळ काढल्याने पुणे शहर पोलीस दलात खळबळ उडाली आहे.मार्शल लुईस लीलाकर असे फरार आरोपीचे नाव आहे. यापूर्वी ससून रुग्णालयातून ड्रग माफिया ललित पाटील याने पळ काढला होता.
मार्शल लुईस लीलाकर याला दोन दिवसांपूर्वी अश्लील शिवीगाळ, कमेंट, प्रकरणी त्याच्यावर सायबर पोलीस ठाण्यात गुरन. ८९/२३ कलम ५००, ५०६, ५०९, सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६७ अन्वये गुन्हा दाखल करून पुणे पोलिसांंनी अटक केली होती. सोशल माध्यमावरून रील्स आणि कमेंट करून शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ याला धमकवल्या प्रकरणी पोलिसांनी लीलाकारला अटक केली होती.
येरवडा जेलमधून प्रकृती खराब असल्याच्या कारणाने त्याला ससून हॉस्पिटल येथे औषधोपचारासाठी आणण्यात आले होते. यावेळी मार्शल लुईस लीलाकर याने पोलिसांना गुंगारा देत पळ काढल्याची माहिती समोर आली आहे. .फरार असलेल्या लीलाकर याच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी तब्बल आठ पथके पाठवली असून त्याचा पोलीस त्याचा शोध घेत आहे.