‘आत्मनिर्भर भारत’ विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन
पुणे, “ विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे भारताने काही वर्षात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. इलेक्ट्रॉनिक्स, फोटोनिक्स, कॉन्टमफिजिक्स, कॉम्प्यूटिंगसारख्या इंटरडिसिप्लिनरी तंत्रज्ञान व नाविन्यतेमुळे देशाच्या औद्योगिक क्षेत्रात क्रांति घडली. यामुळे देशाच्या आर्थिक मजबूतीसाठी डीएसआयआर ही महत्वाची भूमिका बजावेल.” असे विचार डीएसआयआर, भारत सरकारच्या सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजीच्या ज्येष्ठ वैज्ञानिक जी डॉ. सुजाता चकलानोबीस यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ फिजिक्स अॅण्ड इलेक्ट्रीकल्स तर्फे इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड फोटोनिक्समध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि नवनर्मितीच्या माध्यमातून ‘आत्मनिर्भर भारत’ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय पातळीवरील परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या. भारत सरकारच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान विभाग (डीएसआईआर) तर्फे संपन्न होत आहे.
यावेळी ऑप्टिकल फायबर आणि ग्लास प्लोट स्टरलाइट टेक्नॉलॉजीज लि. चे प्रमुख संजित सिंह भाटिया व आयआयएफटीच्या माजी संचालिका डॉ. विजया कट्टी ह्या सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी एमआयटी डब्ल्यूपीयूचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ विश्वनाथ दा. कराड होते.
तसेच, परिषदेचे महासचिव डॉ. आविष्कार कट्टी, एमआयटी डब्ल्यूपीयूचे प्र कुलगुरू व परिषदेचे संयोजक डॉ. मिलिंद पांडे, सीएओ डॉ. संजय कामतेकर, डॉ. रामकृष्ण मन्नतकर व डॉ. सेठी उपस्थित होते. आयोजित परिषदेला एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
यावेळी इलेक्ट्रॉनिक्स व फोटोनिक्सच्या अॅबस्ट्रॅक्स पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
डॉ. सुजाता चकलानोबीस म्हणाल्या,“उद्योग व्यवसायात सेमी कंडक्टरचा महत्वाचा वाटा आहे. यामुळे फोटोनिक्स उद्योग व्यवसाय भरभराटीस येईल. लहान स्वरूपातील सेमी कंडक्टरमुळे संगणक क्षेत्रात सातत्याने बदल होत आहेत. या क्षेत्रात सातत्याने होणारी प्रगती भविष्यात एमएसएमईच्या माध्यमातून फोटोनिक्स मधील नवीन व्यवसायांना वाव मिळेल.”
डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अस्मिता व ‘आत्मनिर्भर भारत’ सारखी खूप चांगली संकल्पना मांडली आहे. आत्मनिर्भर भारतासाठी जीवन साधना आणि समर्पणासाठी त्याग अत्यंत महत्वाचे आहे. विज्ञानाच्या युगातही सर्व वैज्ञानिकांनी अंतिम सत्य ही ईश्वरीय शक्ती मानली आहे. त्याला समजून घेऊन अनुभूती घ्यावी. आजच्या काळात अध्यात्म शास्त्राची वैज्ञानिक प्रयोगशाळा महत्वाची आहे.”
संजित सिंह भाटिया म्हणाले,“ऑप्टीकल फायबर मध्ये भारत आज जगातील प्रथम ५ देशामध्ये अग्रणी आहे. आजच्या युगात इंटर डिसीप्लीनीरीच्या संशोधनाला खूप वाव आहे. भविष्यात इलेक्ट्रॉनिक्स ऐवजी फोटोनिक्स लॅपटॉप जागा घेईल. त्यासाठी फोटोनिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स युगात येथील विद्यार्थी आत्मनिर्भर भारताचे अविभाज्य अंग बनतील.”
विजया कट्टी म्हणाल्या,“एमआयटी डब्ल्यूपीयू हे प्रोग्रेसीव्ह युनिव्हर्सिटी ते प्रो अॅक्टीव असा प्रवास साध्य केला आहे. येथे आयोजित एमआयटी टीबीआय, राइड, हॅकेथॉन सारख्या विद्यार्थ्यांच्या संशोधन आणि नवकल्पनांना वाव देणार्या उपक्रमांमुळे आंत्रप्रेन्यूअरशीपकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला. ही परिषद आत्मनिर्भर भारताकडे घेऊन जाणारी आहे.”
डॉ. आविष्कार कट्टी यांनी प्रास्ताविक व डॉ. संजय कामतेकर यांनी स्वागतपर भाषण केले.
प्रा. भक्ती परांजपे व विणा सांगवीकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ.मिलिंद पांडे यांनी आभार मानले.