अयोध्या – कल्याण ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक – टी एस कल्याणरामन आणि बॉलिवूड मेगास्टार व ब्रँड अॅम्बेसिडरअमिताभ बच्चन यांनी अयोध्येत श्रीरामाचे दर्शन घेतले.कल्याण ज्वेलर्सचे कार्यकारी संचालक राजेश कल्याणरामन व रमेश कल्याणरामन तसेच कार्तिक आर यांनीही त्यांच्यासह श्रीरामाचे दर्शन घेतले.कल्याणरामन कुटुंबाने राम मंदिरात अनकट माणकं, मोती आणि पाचू जडवलेला पोल्की हार राम मंदिरात दान केला. या जयपूर कुंदन, हाताने घडवलेल्या दागिन्याचे वजन अंदाज ५१२ ग्रॅम आहे.ही भेट अतिशय खास असण्यामागचे कारण म्हणजे, कल्याण ज्वेलर्सच्या २५० व्या दालनाचे उद्घाटन केले जात आहे.