पुणे- राष्ट्रवादीचे कार्यालय हे भाडेतत्वावर घेतलेली जागा असून आता त्याचा करारनामा संपल्याचे सांगण्यात येते आहे. अशाच अवस्थेत आता अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही गटांना कार्यालयाची स्वतंत्रपणे गरज निर्माण झाली आहे. शरद पवार गटाचे प्रशांत जगताप यांनी यांनी या कार्यालयावर स्वताबा ठेवला आहे आणि स्वताच्या नावेच करार करून ठेवलेला आहे .निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आल्यानंतर आता त्याचे पडसाद कार्यालयांमध्येही उमटू लागले आहेत. पक्ष आणि चिन्हाचा फैसला झाल्यानंतर या कार्यालयांमध्ये सुद्धा वाद होऊ लागला आहे.
पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यालयावरुन घड्याळ चिन्ह काढून टाकले आहे. मात्र भविष्य़ात पुण्यातील राष्ट्रवादी कार्यालयावर अजित पवार गटाने दावा केला नव्हता पण शरद पवार गटाच्या एका नेत्याच्या वक्तव्याने आणि कृतीमुळे अजित पवार गटाचे कार्यकर्ते आता हा दावा करण्याची शक्यता दिसते आहे. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील राष्ट्रवादीच्या कार्यालयावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार गटाच्या डेंगळे पूल येथील जिल्हा मध्यवर्ती कार्यालयावरचे पक्षाचे नाव आणि घड्याळ हे चिन्ह बुधवारी सायंकाळी काढून टाकण्यात आले. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी स्वत:च्या उपस्थितीत ही कृती करून घेतली. यावेळी नाव आणि चिन्ह काढताना प्रशांत जगताप यांना अश्रू अनावर झाले. ही कृती घडत असताना ते भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.
पुणे हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर किमान राष्ट्रवादीच्या बालेकिल्यात वाद विकोपाला जाणार नाही याची अपेक्षा होती मात्र असं होताना दिसलं नाही. राष्ट्रवादीतील फुटीनंतर पुण्यातील राष्ट्रवादी पक्ष कार्यालयाच्या मालकीवरुन दोन्ही पक्ष एकमेकांवर संतापल्याचे दिसू लागले आहे. त्यामुळे या पक्षकार्यालयाला मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या करारनाम्याच्या आधारे हे पक्ष कार्यालय भाडेतत्वावर राष्ट्रवादी कॉंग्रेसने घेतलं होतं. मात्र फुट पडल्यानंतर अजित पवार गटाने हे कार्यालय ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र शरद पवार गटाने दाद दिली नाही.