पुणे ,
वडगाव शेरी व कॅन्टोन्मेंट भागातील सुमारे 200 महिलांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला.
यामध्ये प्रामुख्याने वैद्यकीय, शैक्षणिक, धार्मिक तसेच कला क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांचा समावेश होता.
श्यामा ताई जाधव, प्रीती ताई शिरीष काकडे तसेच प्रीती भट्टी पाटील यांच्या पुढाकाराने
वडगाव शेरी मतदार संघाचे माजी आमदार आणि माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या तसेच पुणे महिला आघाडी शहराध्यक्षा हर्षदा फरांदे यांच्या उपस्थितीत हे पक्ष प्रवेश करण्यात आले. या मध्ये प्रामुख्याने
गौतमी देवस्थळी (अभिनेत्री), साक्षी कपूर (अध्यात्मिक गुरु), प्रेमाताई मुंडे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) यांचा पक्षप्रवेश करण्यात आला