पुणे:
भारतीय जनता पक्षाच्या गांव चलो अभियाना अंतर्गत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील आज पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील नाणेगावचा प्रवास करत असून, या भेटीत नामदार पाटील नाणेगावच्या ग्रामस्थांशी संवाद साधत आहेत. यावेळी गावच्या शाळेला ही त्यांनी भेट दिली. या भेटीत शाळेच्या मुलांना पुस्तके भेट दिली. या पुस्तकांचे वाचन मुलांना करायला लावले. यावेळी वाचनात अडखळणाऱ्या मुलांना प्रेमाने जवळ करून वाचनास मदत केली. त्यांचे हे नवे शिक्षकी रुप पाहून सर्वांना वेगळाच सुखद धक्का बसला.
भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सध्या संपूर्ण देशात गाव चलो अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत पक्षाच्या सर्व नेत्यांनी गावात जाऊन राहण्याचा; तिथल्या नागरिकांशी संवाद साधण्याचा आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकोपयोगी योजनांची माहिती ग्रामस्थांना देऊन; गावातील लाभार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे अनुभव जाणून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
या अंतर्गत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील बारामती लोकसभा मतदारसंघातील मुळशी तालुक्यातील नाणेगावचा प्रवास करत आहेत. काल त्यांनी गावच्या विठ्ठल मंदिरात जाऊन भजनात भाग घेतला. त्यानंतर ग्रामस्थांसोबत एकत्रितपणे स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला.
आज सकाळी गावातील महिला बचत गटाच्या महिलांनी संवाद साधून, त्यांना माननीय मोदीजींच्या नेतृत्वात महिला सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या येजनांची माहिती दिली. तसेच, प्रधानमंत्री आवास योजना आणि पीएम किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे अनुभव जाणून घेतले. यावेळी नाणेगावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांमध्यै वाचनाची गोडी निर्माण व्हावी; यासाठी गोष्टीची पुस्तके भेट दिली. तसेच, यापैकी काही विद्यार्थ्यांनीना पुस्तक वाचायला लावले.
यावेळी नामदार पाटील यांच्या सुचनेने गांगरुन गेलेल्या विद्यार्थ्यांना प्रेमाने जवळ करून, त्यांना शाळेतील शिक्षकाच्या भूमिकेत जाऊन वाचनात मदत केली. नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे मुलांप्रती आणि शिक्षणाप्रतिचे प्रेम आणि आस्था पाहून ग्रामस्थांना ही सुखद धक्का बसला. यावेळी मुलांना चॉकलेट वाटप केले.