पुणे-पाषाण येथे HEMRL च्या प्रतिबंधित क्षेत्रातील विनापरवाना फार्म हाऊस वर कारवाई करण्यात आली. यावेळी 1500 चौरस फुट मापाचे RCC चे सुरू असलेले पक्के बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. इतर 11 ते 12 बांधकामांना नोटिस देण्यात आली आहे त्यावर आता कारवाई करण्यात येणार आहे. यातील काही अनधिकृत बांधकामे करणारांनी उच्च न्यायालय कडून स्थगिती आदेश प्राप्त केले आहेत.मात्र पालिकेच्या विधी विभागाला यावर न्यायालयात तातडीने आपले म्हणणे सादर करून स्थगिती आदेश उठविण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्याचे सांगण्यात आले आहे हे स्थगिती आदेश उठल्यावर त्यावर तातडीने कारवाई केली जाणार आहे असे उप अभियंता सुनिल कदम यांनी सांगितले.
ही कारवाई कार्यकारी अभियंता बिपीन शिंदे, उप अभियंता सुनिल कदम, शाखा अभियंता राहुल रसाळे , समीर गढई यांनी एक JCB, गॅस कटर , ब्रेकर, 10 बिगारी व पोलिस बंदोबस्त चे मदतीने पूर्ण केली.