आई माता मंदिरा ते शत्रुंजय मंदिर रस्त्यावर पूर्व बाजूच्या २९ अनधिकृत इमारतीवर पालिकेचा बुलडोझर

Date:

पुणे-महापालिकेची परवानगी न घेता बिबवेवाडीतील घाटमाथ्यावर अनेक व्यावसायिकांनी गोडाऊन, दुकाने, शोरूम आदींची अनधिकृत बांधकामे केली आहेत. आई माता मंदिरा ते शत्रुंजय मंदिर रस्त्यावर पूर्व बाजू कडील २९ अनधिकृत आस्थापनांवर आज महापालिकेने बुलडोझर फिरविला .

हिल टॉप हिल स्लोप येथील अनधिकृत इमारतीवर महापालिकेच्या बांधकाम नियंत्रण विभागाने अखेर बुधवार दिनांक ७ फेब्रुवारी २०२४ रोजी कारवाई केली. एक जॉ कटर, चार जेसीबी, चार गॅस कटर, महापालिका मनुष्यबळगट एक, दोन पोलीस गट यांच्या साहाय्याने २९ अनधिकृत आस्थापना पाडण्यात आल्या. तसेच आई माता मंदिरा ते शत्रुंजय मंदिर रस्त्यावर पूर्व बाजू कडील बिबवेवाडी पोलीस चौकीच्या हद्दीतील भागात ही कारवाई करण्यात आलेली आहे.संबंधित बांधकामधारकांना प्रशासनाने वारंवार नोटिसा दिलेल्या आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे प्रशासनाने परिसरात कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.

बिबवेवाडी येथील डोंगरमाथा परिसरात अनेक पक्की बांधकामे करण्यात आली आहेत. तसेच पत्राशेड, गोडाऊन उभारलेले आहेत. या अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
शहर अभियंता प्रशांत वाघमारे, मुख्य अभियंता युवराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. तसेच या प्रसंगी कार्यकारी अभियंता प्रकाश पवार, उपअभियंता शैलेंद्र काथवटे, शाखा अभियंता उमेश सिद्रुक, वंदना गवारी कनिष्ठ अभियंता, पियुष दिघे, ट्युलिप इंजिनीयर प्रथमेश देशपांडे, परीक्षित डोंगरे, जय ससाने या पथकाने सदर कारवाई योग्यरित्या पार पाडली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राज्यात समान नागरी कायद्याबाबत लवकरच निर्णय? एकनाथ शिंदेंचे संकेत

मराठा आरक्षणावर जरांगेंना पुनर्विचाराचे आवाहन; दिशा सालियन प्रकरणावरून ठाकरेंवरही...

महावितरणच्या अभियंत्यांचे योगदान राज्याच्या प्रगतीला गती देणारे : सीएमडी लोकेश चंद्र

महावितरणकडून अभियंता दिन उत्साहात  मुंबई: ‘अभियांत्रिकी ही केवळ एक नोकरी किंवा...

सफाई कर्मचारी व सुरक्षारक्षकांच्या हस्ते महापौर बंगल्यातील श्रीगणरायाची आरती

पुणे, दि. १५ सप्टेंबर २०२६ : गणेशोत्सवाच्या मंगलमय पर्वानिमित्त...

गणपती दर्शनासाठी चंद्रकांतदादा पाटील यांचा रिक्षाने प्रवास

मानाच्या पाचही गणपतींसह दगडूशेठ, भाऊ रंगारी गणपतीचे घेतले दर्शन अडचणीत...