मुंबई दिनांक ४ फेब्रुवारी २०२४
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी मुंबई भाजपाच्या वतीने मुंबई अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वात ‘ घर चलो’ अभियानाची यशस्वी सुरुवात करण्यात आली. यामध्ये मुंबईतील सहा लोकसभा मतदार संघात संघटनात्मक बैठकांसोबतच स्थानिकांसोबत संवाद कार्यक्रम घेण्यात आले.
या अभियानांतर्गत मोदी सरकारने केलेल्या विकास कामांना जनतेपर्यंत पोहोचवले जात आहे. आ. ॲड. आशिष शेलार यांच्या उपस्थितीत वांद्रे पश्चिम विधानसभेत येणाऱ्या मिरा मधुरा इमारत, वांद्रे रिक्लमेशन येथून अभियानाची सुरुवात करण्यात आली. खा. गोपाळ शेट्टी यांनी बोरीवली मागाठाणे येथील आयोजित अभियानात उपस्थिती दर्शवली. खा. मनोज कोटक यांनी मुलुंड परिसरात विविध उपक्रमांचे आयोजन केले. खा. पुनम महाजन यांनी चांदिवली विधानसभेत आयोजित उपक्रमात सहभाग घेतला. आ. कॅप्टन तमिल सेलवन यांनी सायन कोळीवाडा विधानसभेतील स्थानिक रहिवाशांच्या घरी जाऊन मोदी सरकारच्या विकासकामांची माहिती दिली. आ. पराग अळवणी यांनी १४० घरांमध्ये भेट देऊन मोदी सरकारने केलेल्या कामाची माहिती देणारे पत्रक वाटले. तसेच बूथ समिती बैठक घेऊन ५१ टक्के पेक्षा अधिक मते मिळविणे,सरल ॲप,नमो ॲप व पन्ना प्रमुख तसेच स्थानिक प्रश्नांबाबत चर्चा केली. आ. अमित साटम यांनी स्थानिक पातळीवर अभियान राबविले. आ. भारती लवेकर यांनी कोळीवाड्यातील मच्छीमार बंधूं-भगिनींशी संवाद साधला. आ. विद्या ठाकूर यांनी गोरेगाव विधानसभेत अभियानाचे आयोजन केले. आ. अतुल भातखळकर यांनीही आपल्या मतदारसंघातील घरोघरी भेट देवून संवाद साधला. आ. योगेश सागर यांनी कांदिवली पश्चिम – चारकोप विधानसभा मतदार संघातील नागरिक आणि मतदार यांच्या भेटी घेऊन केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली.
आ. मनीषा चौधरी यांच्या उपस्थितीत दहिसर विधानसभेत “घर घर चलो अभियान” ची सुरुवात झाली. आ. सुनील राणे यांच्या उपस्थितीत अभियानाची सुरुवात बोरिवली विधानसभेतील चारकोप येथून झाली. याप्रसंगी चारकोपमधील स्थानिक रहिवाशांच्या घरी चहापान कार्यक्रम झाला. यावेळी विविध विषयांवर सखोल चर्चा झाली. तसेच मुंबई भाजपा विविध सेल आघाड्यांच्या वतीने स्थानिक पातळीवर ‘घर चलो ‘ अभियान यशस्वीरित्या राबवण्यात आले. यावेळी सर्व भाजपा वॉर्ड अध्यक्ष, कोअर महिला मोर्चा व युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी, सुपर वॉरियर, शक्तिकेंद्र प्रमुख, बुथ प्रमुख यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.