इन्फोसिस फाऊंडेशन आणि भारतीय विद्या भवन तर्फे आयोजन
पुणे:इन्फोसिस फाऊंडेशन आणि भारतीय विद्या भवनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित दोन दिवसीय ‘इंडिया इंटरनॅशनल डान्स फेस्टिव्हल’चा समारोप रवीवारी,४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी झाला.
या नृत्य महोत्सवाचे आयोजन दि.३ आणि ४ फेब्रुवारी रोजी भारतीय विद्या भवन चे सरदार नातू सभागृह येथे करण्यात आले.दि.३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच ते रात्री साडेआठ दरम्यान नृत्य सादरीकरणे रंगली. ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी दीडपर्यंत आणि सायंकाळी साडेचार ते रात्री साडेआठपर्यंत या फेस्टिव्हलमधील नृत्य सादरीकरणे झाली.
भरतनाट्यम,कथक,ओडिसी,मोहिनीअट्टम,कथकली,बंगाली लोकनृत्य अशा नृत्य प्रकारांचा या महोत्सवात समावेश होता.
रविवारी सकाळ च्या सत्रात ११ ते दीड च्या सत्रात कथक, ओडिसी, भरत नाट्यम, कुचीपुडी हे नृत्य प्रकार सादर झाले. मेघना साबडे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
सायंकाळ च्या सत्रात दिव्यांग आणि विशेष मुलांनी त्यांच्या नृत्य कौशल्याने मने जिंकली. सेरेब्रल पल्सी, डाऊन सिंड्रोम अशा आजाराने ग्रस्त असूनही त्यांनी प्रभावी सादरीकरण केले.
त्यानंतर बंगाली लोक नृत्य, वेस्टर्न बॅले असे नृत्यप्रकार सादर झाले.
शनीवारी नृत्य महोत्सवाचे उदघाटन नृत्यगुरु सुचित्रा दाते आणि शशिकला रवी यांच्या उपस्थितीत झाले.अनेक संस्था आणि कलाकारांनी नृत्य सादरीकरणे केली. २०१९ मध्ये या नृत्य महोत्सवाची सुरुवात झाली.यावर्षी एकूण ८० कलाकार या महोत्सवात सहभागी झाले .
रसिका गुमास्ते या महोत्सवाच्या संयोजक असून संयोजन समितीत अस्मिता ठाकूर,नेहा मुथियान,शमा अधिकारी यांचा समावेश होता. हा महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य होता.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे यांनी कलाकारांचे स्वागत केले. शारंगधर साठे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.