Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

प्राचीन आणि आधुनिकतेचा संगम साधत श्रीमंत बाबुजी नाईक वाडा परिसर विकसित करा – उपमुख्यमंत्री

Date:

बारामती, दि. ४: प्राचीन आणि आधुनिकतेचा संगम साधत श्रीमंत बाबुजी नाईक वाडा परिसर विकसित करा; कामे  करतांना वाड्याचे मूळ रूप जतन झाले पाहिजे यासाठी वास्तुविशारदची मदत घ्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी बारामती परिसरातील विद्या प्रतिष्ठान ते जळोची रस्ता, ३५५ दशलक्ष क्षमता असेलल्या साठवण तलावाशेजारील कॅनॉल सुशोभिकरण, तीन हत्ती चौक येथील ट्राफिक कन्सल्टन्ट यांच्या प्रस्तावित लाईन आऊट, कऱ्हा नदी सुशोभिकरणाअंतर्गत सुरु असलेल्या लेंढी नाला व कसबा पूल व श्रीमंत बाबुजी नाईक वाडा, दशक्रिया घाट परिसर तसेच नवीन बारामती बस स्थानक येथील विविध विकास कामांची पाहणी करुन संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

यावेळी अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव , उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, महावितरणचे मुख्य अभियंता सुनील पावडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बप्पा बहीर आदी उपस्थित होते.

विद्या प्रतिष्ठान ते जळोची रस्त्याची एम.आय.डी.सी अंतर्गत करण्यात येणाऱ्या सुशोभिकरणाअंतर्गत रस्त्याच्याकडेला शौचालयाची उभारणी करावी. रस्त्याच्या कडेला असलेल्या वृक्षाची इतरत्र पुनर्लागवड करावी. तीन हत्ती चौक येथील वाहतुकीची वर्दळ लक्षात घेता आवश्यकता असल्यास सिग्नलची उभारणी करावी.

३५५ दशलक्ष क्षमता असेलल्या साठवण तलाव शेजारील कॅनॉल सुशोभिकरणाची कामे करतांना नागरिकांची वर्दळ लक्षात घेता शौचालयाची उभारणी करावी. त्यामध्ये लहान मुलांसाठी वेगळी शौचालयाची व्यवस्था करावी. तलाव परिसर स्वच्छ राहील याबाबत दक्षता घ्यावी. परिसरात अधिकाधिक वृक्षारोपण करण्यात यावे.

कऱ्हा नदी सुशोभिकरणाअंतर्गत सुरु असलेल्या लेंढी नाला व कसबा पूल व श्रीमंत बाबुजी नाईक वाडा येथील विकासकामे करतांना परिसरात अधिकाधिक वृक्षारोपण करावे. परिसरात असलेल्या वृक्षाला गोल दगडी ओटा करा. कसबा पुलावरील कठड्याला डोळ्याला त्रास होणार नाही आणि परिसराला शोभेल अशी रंगरंगोटी करावी. लेंढी नाला परिसरातील बंधाऱ्याची कामे गतीने पूर्ण करा. पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होणार नाही, याबाबत दक्षता घ्या.

परिसर देखभाल दुरुस्तीसाठी नगर परिषदेने उत्पन्नाचे स्रोत निर्मितीबाबत विचार करावा

बारामती बसस्थानक इमारत नूतनीकरणाची कामे करतांना नागरिकांना स्पष्ट दिसेल असे नामफलक लावा.  बसस्थानक परिसर स्वच्छ राहील, याबाबत काळजी घ्यावी. येत्या काळात बसस्थानकाचे लोकार्पण करण्यात येणार असून त्यादृष्टीने गतीने कामे पूर्ण करावीत, असेही श्री.पवार म्हणाले.

आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक सभा मंडपाचे उद्घाटन

पाहणी दौऱ्यानंतर उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते मळद गावठाण येथील  आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक सभा मंडपाचे उद्घाटन करण्यात आले.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल ढेपे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, तहसीलदार गणेश शिंदे, मुख्याधिकारी महेश रोकडे, उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, बसस्थानक आगार प्रमुख वृषाली तांबे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर, बारामती सहकारी बँकचे अध्यक्ष सचिन सातव, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष जय पाटील, बाळासाहेब जाधव आदी यावेळी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पण्यात पाऊस सुरूच… मुठेत आता 15 हजाराचा विसर्ग

पुणे: शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस...

“स्त्रियांच्या गरजा समजून घेतल्याशिवाय सेवा अपूर्ण”- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा ‘आरोग्यवारी’ उपक्रमात विशेष सहभाग

वारीतील महिला सुरक्षेसाठी प्रशासन सज्ज; ‘आरोग्यवारी’ उपक्रमातून व्यापक व्यवस्था पुणे,...

नियमांचा भंग करणाऱ्यांवर थेट गुन्हे नोंदवा

पीएमआरडीएच्या महानगर आयुक्तांची भूमिका : हिंजवडी भागातील नागरी समस्यांवर...