मोदी- शहांनी राजकारण खराब केले -डॉ. कुमार सप्तर्षी /सिव्हील सोसायटी गप्प बसणार नाही: डॉ विश्वंभर चौधरी

Date:

गांधी भवन मधील लोकसंसद मध्ये परिवर्तनाचा निर्धार !

पुणे:

रविवारी गांधी भवन येथे झालेल्या लोकसंसद मध्ये परिवर्तनाचा निर्धार करण्यात आला! नागरीक,सिव्हील सोसायटी आता घरात बसणार नाही तर भाजपच्या विरोधात मतदान होईपर्यंत मैदानात खंबीरपणे काम करणार आहे, असे या लोक संसद मध्ये निक्षून सांगण्यात आले.युवक क्रांती दल,रिपब्लिक युवा मोर्चा,निर्भय बनो,पँथर आर्मी,स्वराज्य क्रांती सेना,संविधान प्रचारक चळवळ,सत्यशोधक बहुजन आघाडी,संविधानिक राष्ट्रवाद मंच आणि अभ्यासिका विद्यार्थी कृती समिती यांच्या वतीने लोकसंसद चे आयोजन करण्यात आले.

केंद्र सरकार भारतीय संसदेला धर्मसंसद बनविण्याचा प्रयत्न करत आहे, हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी भाजपविरोधी पक्ष संघटनांनी रविवारी , दि.४ फेब्रुवारी रोजी ‘लोकसंसद’ हा कार्यक्रम आयोजित केला . त्याला मोठा प्रतिसाद मिळाला.’लोकसभा निवडणुकीत सत्ता परिवर्तन करण्यासाठी सच्चा भारतीय मतदारांचे जनआंदोलन ‘ या उद्देशाने लोकसंसद उपक्रम आयोजित करण्यात आला.

प्रारंभी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.सद्य स्थिती आणि भविष्याचा वेध,सत्ता परिवर्तनाची व्यूह रचना , मोदी सरकारची १० अपयशी वर्षे, भाजपचा खरा अजेंडा, सत्ता परिवर्तनाची रण नीती अशी अनेक सत्रे या लोक संसद मध्ये आयोजित करण्यात आली होती.

युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम कोथरूड येथील गांधी भवनात दुपारी एक ते सायंकाळी पाच या झाला . लोकसंसदेत रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे हे स्वागताध्यक्ष होते. डॉ.विश्वंभर चौधरी, डॉ अभिजित वैद्य,अभ्यासक चंद्रकांत झटाले, सामाजिक कार्यकर्ते अब्दुल सत्तार शहा, धर्मगुरू बिशप थॉमस डाबरे, ह भ प धर्मकिर्ती परभणीकर, युनूस तांबटकर अशा अनेक मान्यवरांनी भाषणे केली.

सभागृहात डॉ अभिजित वैद्य,डॉ. अच्युत गोडबोले, आनंद करंदीकर,डॉ. उर्मिला सप्तर्षी,डॉ प्रवीण सप्तर्षी, अन्वर राजन, प्रशांत कोठदिया, फिरोज मुल्ला,अभय छाजेड, संदीप बर्वे, जांबुवंत मनोहर, उत्पल व. बा., रवींद्र धनक,अप्पा अनारसे, एम एस जाधव, इद्रिस कारी सुदर्शन चखाले आदी मान्यवर उपस्थित होते.

स्वागताध्यक्ष राहुल डंबाळे यांनी लोकसंसदेच्या आयोजनामागील हेतू स्पष्ट केला. लोकशाही व्यवस्था टिकली पाहिजे, असे ज्यांना ज्यांना वाटते त्यांच्यासाठी लोकसंसद हे जनआंदोलन आहे.नरेंद्र मोदींची लोकप्रियता, भाजपची ताकद गोबेल्स नीतीने तयार केली असून ती खोटी आहे, असे ते म्हणाले.

सिव्हील सोसायटी गप्प बसणार नाही: डॉ विश्वंभर चौधरी
डॉ. विश्वंभर चौधरी म्हणाले,’ इंडिया आघाडीची ताकद अजूनही चांगली आहे. भाजप आपली ताकद फुगवून सांगत आहे. भाजपचे दक्षिणेचे दार बंद झाले आहेत. पूर्वोत्तर भागात भाजप विरोधी वातावरण आहे.विरोधी पक्षाला हतबलता वाटली तर नागरिकांनी, सिव्हील सोसायटीने पुढे येवून या पक्षांना युद्धासाठी तयार केले पाहिजे. शेतकरी भाजपाच्या विरोधात गेले आहेत.आर्थिक धोरणांमुळे मोदी सरकार हरणार आहे.कितीही पळपुटे बाजीराव महाराष्ट्रात भाजपकडे गेले तरी इथे ४७ टक्के मते इंडीया आघाडी कडे आहेत. चंद्रकांत पाटील हे कोथरुड मधून निवडणुक जिंकणार नाहित, असे भाजपचे लोक बोलतात.देशात भाजपा आघाडी २५० पर्यंत आटपणार आहे. नंतर भाजप अंतर्गत मतभेद उफाळून येणार आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या बद्दल प्रचंड सहानुभूती आहे. राज्यात १३ जागांच्या वर भाजपा जाणार नाही.उत्तरेची लादली जाणारी संस्कृती ठोकरून महाराष्ट्र धर्म जपला पाहिजे.

अनैतिक कारभारी बदलणे हाही सत्याग्रह: डॉ. सप्तर्षी

डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले,’ नरेंद्र मोदी यांनी खोटे बोलण्याचा जागतिक विक्रम केला आहे. बकासुराची भूक भागत नसते, त्या प्रमाणे हे रोज एक मुख्यमंत्री खात सुटले आहेत. मोदींनी, शहांनी सर्व राजकारण खराब करून टाकले आहे.लोकसभा निवडणुक होईपर्यंत अनेक अटक सत्रे होणार आहेत.इडी ला पैसै खाणारे भाजपवाले का दिसत नाहीत? ज्यांना निवडून दिले, ते काम करीत नसल्याने मतदारांनी निवडणुक हाती घ्यावी. अनैतिक कारभारी बदलणे हाच सत्याग्रह आहे.

ह.भ.प.धर्मकिर्ती परभणीकर म्हणाले, ‘ भाजपच्या राज्यात सलोख्याचे प्रदेश उध्वस्त करणे चालू आहे. वारकरी परंपरेचे ब्राहमणीकरण करणे चालू आहे. वारकरी मुल्यांच्या विरोधात काम सुरू आहे. आम्हीं महाराष्ट्र हातातून जावू देणार नाही. दंगली करणाऱ्या व्यक्तीच्या हाती सत्ता जावू देणार नाही’.

बिशप थॉमस डाबरे म्हणाले, ‘ संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांचा महाराष्ट्र आहे.धर्मा धर्मात असंतोष वाढीस लागणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. अल्पसंख्य समुदायाला सुरक्षित वाटेल असे वातावरण देशात असले पाहिजे. कोणीही ईतर धर्मा विरोधात विधाने करता कामा नये. गरिबांची स्थिती सुधारली पाहिजे’.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

… अन्यथा शिंदेंच्या शिवसेनेवर राज्यभर बहिष्कार:पुणे श्रमिक पत्रकार संघाचा इशारा

पुणे: पत्रकारांना धमक्या दिलेले खासदार संजय दिना पाटील यांना...

पत्रकारांचा अपमान करणाऱ्या खासदारावर कडक कारवाई करावी – राजा माने

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सर्व जिल्ह्यात करणार आंदोलन मुंबई...

पुण्यात 4C कॉस्मो कार केअर सेंटरच्या पहिल्या केंद्राच्या उद्घाटनासह कॉस्मो कन्झ्युमरने ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट क्षेत्रात आपले स्थान केले आणखी मजबूत

पुणे, 25 जून 2026: कॉस्मो फर्स्ट लिमिटेडच्या ग्राहकाभिमुख व्यवसाय विभाग असलेल्या कॉस्मो कन्झ्युमरने आज पुण्यात आपल्या पहिल्या 4C कॉस्मो कार केअर सेंटरच्या उद्घाटनाची घोषणा केली. या माध्यमातून कंपनीने संघटित वाहन संरक्षण आणि कार केअर सेवा क्षेत्रात धोरणात्मक विस्तार केला आहे. मजबूत ऑटोमोटिव्ह परिसंस्था, वाढता प्रीमियम वाहनांचा ग्राहकवर्ग आणि वाहन संरक्षण उपायांचा वाढता ग्राहक स्वीकार या कारणांमुळे पुण्याची पहिल्या केंद्रासाठी निवड करण्यात आली. कंपनीच्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट पोर्टफोलिओमधील कॉस्मो पीपीएफ पेंट प्रोटेक्शन फिल्म्स, कॉस्मो सनशील्ड विंडो फिल्म्स आणि कॉस्मो गार्ड कोटिंग्ज व कंपाऊंड्स यांना मिळालेल्या मजबूत प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर हे उद्घाटन करण्यात आले आहे. आर्थिक वर्ष 26 मध्ये या व्यवसायाने 23 कोटी रु. चा महसूल नोंदवला असून, विंडो फिल्म्ससाठी 75 हून अधिक वितरक आणि पेंट प्रोटेक्शन फिल्म्ससाठी 40 वितरक अशा देशव्यापी वितरण जाळ्याच्या बळावर ही वाढ साध्य झाली आहे. नवीन 4C केंद्र हे उत्पादनातील नवकल्पना, वितरण विस्तार, सेवा क्षमता आणि ग्राहक सहभाग यांच्या एकत्रित माध्यमातून ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट मूल्यसाखळीत आपले स्थान अधिक बळकट करण्याच्या कॉस्मो कन्झ्युमरच्या व्यापक धोरणाचे प्रतिक आहे. वाहनांचे सौंदर्य जपणे, अधिक आरामदायी अनुभव देणे आणि वाहनाचे दीर्घकालीन मूल्य टिकवून ठेवणे यासाठी ग्राहकांकडून वाढत्या प्रमाणात उपाययोजनांची मागणी होत असल्याने वेगाने विकसित होत असलेल्या कार केअर आणि वाहन संरक्षण बाजारपेठेत कंपनीला मोठ्या संधी दिसत आहेत. या घडामोडीबाबत बोलताना कॉस्मो फर्स्टचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज पोद्दार म्हणाले, “कॉस्मो फर्स्टमध्ये आम्ही सातत्याने उच्च वाढीची क्षमता असलेली क्षेत्रे ओळखून त्यामध्ये व्यवसाय उभारले आहेत. ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट हे असेच एक भरपूर व्यवसाय संधी असलेले क्षेत्र आहे. भारतातील विंडो फिल्म बाजारपेठेचा आकार सुमारे 1,000 कोटी रु. असल्याचा अंदाज आहे तर पेंट प्रोटेक्शन फिल्म विभागात दरवर्षी जवळपास 30% वाढ होत आहे. त्यामुळे दर्जेदार उत्पादने आणि विश्वासार्ह सेवा देणाऱ्या संघटित कंपन्यांसाठी मोठी संधी उपलब्ध आहे. आमच्या पहिल्या 4C केंद्राचे उद्घाटन हे त्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. 4C नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी आणि कॉस्मो पीपीएफ तसेच कॉस्मो सनशील्ड या आमच्या ब्रँड्सना अधिक बळकटी देण्यासाठी आम्ही सुमारे 20 कोटी रु. ची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. येत्या काही वर्षांत वाहन संरक्षण आणि कार केअर क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी म्हणून कॉस्मो कन्झ्युमरची ओळख निर्माण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.” नवीन कॉस्मो कार केअर सेंटरमध्ये ग्राहकांना एकाच छताखाली वाहन संरक्षण आणि वाहन सौंदर्यवर्धनाशी संबंधित सर्वसमावेशक सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये ऑटोमोटिव्ह विंडो फिल्म्स, पेंट प्रोटेक्शन फिल्म्स, कोटिंग्ज, डिटेलिंग सोल्यूशन्स तसेच वैशिष्ट्यपूर्ण कार केअर सेवांचा समावेश असेल. प्रीमियम उत्पादनांमध्ये व्यावसायिक दर्जाची जोडणी आणि कुशल सेवा यांचा संगम घडवून विना अडथळा, अखंड आणि समाधानकारक ग्राहक अनुभव देण्यासाठी या केंद्राची रचना करण्यात आली आहे. उद्घाटनाबाबत बोलताना कॉस्मो कन्झ्युमरचे व्यवसाय प्रमुख अभिनीश दास म्हणाले, “आमच्या पहिल्या कॉस्मो कार केअर सेंटरचे उद्घाटन हा ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट क्षेत्रातील आमच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. गेल्या वर्षभरात आम्ही आमची उत्पादने, वितरण जाळे आणि इंस्टॉलर भागीदारी यांच्या माध्यमातून मजबूत पाया निर्माण केला आहे. 4C च्या माध्यमातून आम्ही या सर्व क्षमतांना एकत्र आणत ग्राहकांना एकाच छताखाली संपूर्ण वाहन संरक्षण आणि कार केअरचा अनुभव उपलब्ध करून देत आहोत. भविष्याचा विचार करता आर्थिक वर्ष 26-27 दरम्यान भारतभरात सुमारे 35 कॉस्मो कार केअर सेंटर स्थापन करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. यामुळे देशव्यापी प्रीमियम कार केअर केंद्रांचे जाळे उभारण्याच्या आमच्या बांधिलकीला अधिक बळ मिळेल.” गेल्या वर्षभरात कॉस्मो कन्झ्युमरने कॉस्मो सनशील्ड अंतर्गत कार्बन पिगमेंट सिरीज सादर करून तसेच कॉस्मो पीपीएफ अंतर्गत चार नवीन प्रकार बाजारात आणून आपला उत्पादन पोर्टफोलिओ अधिक मजबूत केला आहे. तसेच, बाजारपेठेतील पोहोच वाढवण्यासाठी आणि ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी कंपनीने भारतभरातील विविध डिटेलिंग स्टुडिओंसोबत भागीदारी केली आहे. पुढील काळात कॉस्मो कन्झ्युमर भारतातील प्रमुख ऑटोमोटिव्ह बाजारपेठांमध्ये 4C मॉडेलचा विस्तार करण्याची योजना आखत आहे. यासोबतच विपणन उपक्रमांमध्ये आक्रमक गुंतवणूक, वितरण व भागीदार जाळ्याचा विस्तार आणि सातत्यपूर्ण नवनवीन कल्पना तसेच नवीन ऑटोमोटिव्ह केअर सोल्यूशन्सच्या माध्यमातून उत्पादन पोर्टफोलिओ अधिक सक्षम करण्यावर कंपनी भर देणार आहे. यामुळे देशातील वेगाने वाढणाऱ्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट उद्योगातील तिचे स्थान आणखी मजबूत होईल.

पीएमपीएमएलसाठी महापालिकेची खास सभा-श्रीनाथ भिमाले

पुणे, दि. २५ जून : शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा...