Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

लोकशाही सशक्तीसाठी प्रशासकीय अधिकार्‍यांची सेवा महत्वाची

Date:

डॉ. जयप्रकाश नारायण यांचे मतः एमआयटीत डब्ल्यूपीयूत यूपीएससीच्या यशस्वितांचा १४वा राष्ट्रीय पातळीवर सत्कार संपन्न
पुणे, २६ जुलैः “लोकशाहीला सशक्तीसाठी प्रशासकीय अधिकार्‍यांची सेवा अत्यंत महत्वाची आहे. राष्ट्रप्रगतीसाठी मानव सेवा हा महत्वाचा घटक आहे. ग्रामीण क्षेत्राच्या उन्नतीसाठी प्रशासकीय सेवेत खूप काही करण्यासारखे आहे. त्याच प्रमाणे नव्या पिढीसाठी देशात गुणवत्तापूर्ण उत्तम दर्जाचे शिक्षण आणावे.” असे मत लोकसत्ता पार्टीचे अध्यक्ष व माजी सनदी अधिकारी डॉ. जयप्रकाश नारायण यांनी मांडले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी व एमआयटी स्कूल ऑफ गर्व्हमेंट, पुणेतर्फे एमआयटी डब्ल्यूपीयूच्या संत ज्ञानेश्वर सभागृह, कोथरूड येथे आयोजित करण्यात आलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) स्पर्धा परीक्षा२०२३ मध्ये यशस्वितांचा १४वा राष्ट्रीय पातळीवरील सत्कार सोहळ्याच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) माजी अध्यक्ष डी.पी.अग्रवाल हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.
यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ.आर.एम.चिटणीस, डॉ. के. गिरीसन आणि प्रा.परिमल माया सुधाकर उपस्थित होते.
या सोहळ्यात देशातून द्वितीय आलेले अनिमेष प्रधान यांना ७५ हजार रूपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले. त्याच बरोबर १६० यशस्वितांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. शाल, मानपत्र असे सत्काराचे स्वरूप होते.
डॉ. जयप्रकाश नारायण म्हणाले,” सार्वजनिक सेवा ही एक विशेष सेवा असून ती समाज आणि देशाच्या विकासासाठी असावी. प्रशासकीय सेवेत कार्य करताना परिश्रमावर विश्वास ठेवा. सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन कार्य करण्याची आवश्यकता आहे. लोकसेवेसाठी जास्तित जास्त वेळ देणे गरजेचे आहे. आपण जसा व्यवहार करू तशीच परतफेड समाजाकडून मिळेल. मानवतेला प्राथमिकता देऊन त्यांच्या कल्याणासाठी कार्य करावे. ”  
डॉ.डी.पी अग्रवाल म्हणाले,” नागरी सेवांमध्ये प्रवेश करण्याचा आपला हेतू कधीही विसरू नका. प्रत्येक सेवमध्ये प्रचंड आव्हाने आहेत. आपण लोकांच्या जीवनात बदल आणत आहोत. या क्षेत्रात राहूण आव्हानांचा सामना करावा. समाजाच्या व देशाच्या प्रगतीसाठी योग्य ध्येय धोरणे बनवूण त्यावर अंमलबजावणी करावी. प्रामाणिकता आणि पारदर्शकतेने कार्य केल्यास देशाचा विकास होईल.”  
डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,”करियर आणि जीवनाचे तत्वाज्ञान हे वेगवेगळे असते. त्याचे संतुलन ठेवून आपल्या जीवनाची प्रगती करावी. जीवनामध्ये शिस्त आणि चारित्र्य महत्वाचे असते. मानवता आणि सहिष्णूता हा संदेश लक्षात ठेऊन प्रशासकीय कार्य करावे. जगामध्ये विश्वशांतीचा मार्ग दाखविण्याचे कार्य आपल्या खांद्यावर आहे.”  
राहुल कराड म्हणाले,”समाजात जागृती घडवून आणण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे.  समाज परिर्वनात शिक्षण व्यवस्था सर्वोत्कृष्ट भूमिका पार करू शकते. डब्ल्यूपीयूमध्ये  पारदर्शकता असून येथे शिक्षणाबरोबरच सामाजिकतेला महत्व दिले आहे. देशातील राजकारणात शिक्षित लोक आले तर लोकशाही सशक्त होईल. त्यामुळेच वर्तमानकाळात सर्वांना वसाहतवादी मानसिकता बदल्यण्याची गरज आहे.”  
अनिमेष प्रधान म्हणाला,”आपल्याला काय करावयाचे आहे प्रथम ठरवा. त्यासाठी विज्ञान आणि अध्यात्माचा धागा पकडून आपली सेवा दयावी. देशाला प्रगतीपथावर नेतांना आपली सेवा बहुमूल्य असून यासाठी कठोर परिश्रमाची गरज आहे.”  
डॉ.आर.एम.चिटणीस यांनी प्रास्ताविक व स्वागतपर भाषण केले.
प्रा.डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. के. गिरीसन यांनी आभार मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

वडगावशेरी मतदारसंघातील पाणीपुरवठा सुरळीत करावा – आमदार बापूसाहेब पठारे

पुणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त एम. जे. प्रदीप चंद्रन यांच्या...

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीत लागलेल्या आगीची उच्चस्तरीय चौकशी करावी – आमदार बापूसाहेब पठारे

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे पठारे यांची मागणी.. पुणे...

मागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नका

महावितरणचे शेतकऱ्यांना आवाहन मुंबई, दि. 30 एप्रिल 2025 - मागेल त्याला सौर...