मुंबई, पुणे आणि घाटमाथ्यावर रेड आणि ऑरेंज अलर्ट रेड अलर्ट
मुंबई– महाराष्ट्रात मान्सूनच्या आगमनानंतर चार जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत १७२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) गुरुवारी दुपारी १५ फूट उंचीच्या लाटा येण्याचा इशारा दिला आहे. लोकांना समुद्रापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान, राज्यात मान्सूनने रौद्ररूप धारण केले असून मुंबई, ठाणे आणि कोकणासह अनेक जिल्ह्यांमध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील ८ तासांत पावसाचा जोर आणखी वाढण्याचा इशारा दिला असून नागरिकांना अत्यंत महत्त्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. या गंभीर पार्श्वभूमीवर प्रशासनाने हायअलर्ट जारी केला आहे. मुसळधार पावसाचा धोका ओळखून पालघर आणि रायगड जिल्ह्यातील शाळांना जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केली आहे. रायगडमधील सर्वाधिक फटका बसलेल्या ७ तालुक्यांमध्ये शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मुंबई, पुणे आणि घाटमाथ्यावर रेड आणि ऑरेंज अलर्ट रेड अलर्ट: पालघर, पुणे आणि घाटमाथा परिसरासाठी आज ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. ऑरेंज अलर्ट: मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. मुंबईतील हिंदमाता, चेंबूरच्या सुभाषनगरसह अनेक सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली असून पालिकेने नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे.

