नागपूर : येत्या शुक्रवारी ९ फेब्रुवारीपासून इव्हीएम हटाओ कृती समितीतर्फे राज्यात सुरु होणाऱ्या अखंड आंदोलनासाठी उपराजधानी नागपूर येथील पन्नासहुन अधिक संघटना एकवटल्या असून त्याही मैदानात उतरत आहेत.
इव्हीएम हटाओच्या या लढ्यासाठी संविधान समर्थक दलाचे सरचिटणीस सतीश डोंगरे यांनी दोन आठवड्यापासून नागपूर येथे तळ ठोकला आहे.तेथील संपर्क मोहिमेत डोंगरे यांनी डॉ. प्रसेन निकोसे यांची भेट घेऊन डॉ. माईसाहेब आंबेडकर यांचा ‘सूर्यप्रभा ‘ हा स्मृतिग्रंथ त्यांना भेट दिला.
त्यांनी विदर्भातील अनेक संघटनाशी, नेत्यांशी संपर्क साधून त्यांची एकजूट घडवली आहे. त्यात आयटक, भारत जोडो आंदोलन, अभियंत्यांची बानाई संघटना, समता सैनिक दल, वकिलांची संघटना अशा एकूण ५६ संघटना इव्हीएम विरोधात रस्त्यावर उतरणार आहेत.