पुणे-उल्हासनगरमधील गोळीबार प्रकरणी राज्याच्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. राज्यात गुंडाराज सुरू असून यातून सत्तेची मस्ती दिसून येत असल्याची टीका त्यांनी केली आहे.दरम्यान सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, पोलिस स्थानकात जर गोळीबार होत असेल तर राज्याच्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री शिंदे यांनी राजीनामा घ्यायला हवा, अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे. सर्वसामान्य माणूस आणि महाराष्ट्र यामत भरडला जात आहे. राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचा आरोप सुळे यांनी केला आहे.सुप्रिया सुळे म्हणाल्या की, उल्हासनगर गोळीबार प्रकरणी मी संसदेत मुद्दा उपस्थित करणार आहे. आणि देशाच्या गृहमंत्र्यांपर्यंत हे सर्व प्रकरण पोहचवणार आहोत. पोलिस ठाण्यात फायरिंग करताच कसे ही केवळ सत्येची मस्ती आहे. कॅमेरे असताना पोलिसांसमोर भांडणं होतात तिथे एखाद्या आमदाराची गोळीबार करण्याची हिंमत होतेच कशी? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. देश नियम आणि कायद्याने चालत असतो, सत्तेच्या मस्तीने नाही असे त्यांनी म्हटले आहे.
उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाच्या कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. जखमी महेश गायकवाड यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर गोळीबार करणाऱ्या भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तीन जणांना अटक करण्यात आली आहे. 50 गुंठ जमिनीच्या वादातून हा सर्व प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे. अशातच भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी याप्रकरणी प्रसार माध्यमांशी बोलताना आपली बाजू सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी गणपत गायकवाड यांनी होय, मीच गोळीबार केला, असे म्हणत गोळीबार केल्याचे मान्य केले आहे.