मुंबई-लोकसभा निवडणूक काही दिवसांवर आली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपावर मंथन सुरू आहे. मविआमध्ये काही जागांबद्दल तिढा आहे,महाविकास आघाडीची आज ट्रायंडट हॉटेलमध्ये जागा वाटपासंदर्भात बैठक सुरू आहे. ही बैठक जागावाटपाच्या बाबतीत महत्त्वाची ठरणार आहे. कारण ह्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर ही उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान काही दिवसापूर्वी आपण महाविकास आघाडीत सामील झालो आहोत, असे विधान केले होते.
![](https://mymarathi.net/wp-content/uploads/2024/02/WhatsApp-Image-2024-02-02-at-12.55.07-1024x770.jpeg)
महाविकास आघाडीची लोकसभा जागा वाटपासंदर्भात महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीत त्या 8 ते 10 मतदारसंघावर चर्चा होऊ शकते, ज्यांच्यामुळे जागा वाटप रखडले आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीचा समावेश झाल्यानंतरची ही पहिली बैठक असून, या बैठकीला प्रकाश आंबेडकर उपस्थित आहेत.
महाविकास आघाडीची यापूर्वी 25 जानेवारी रोजी बैठक झाली होती. त्यात सीपीआय व सीपीएम नेत्यांशी चर्चा झाली होती. विशेषतः या बैठकीत प्राथमिक जागावाटप निश्चित झाले होते. संजय राऊत यांनी या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना वंचित व राजू शेट्टी यांना बैठकीला बोलावण्यात आल्याचे सांगितले होते. त्यावरून महाविकास आघाडीने या प्रकरणी छोट्या घटक पक्षांनाही विश्वासात घेतल्याचे स्पष्ट होत आहे. तर 3 दिवसांपूर्वीही मविआची बैठक झाली होती.