पुणे:नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुणे पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला
राज्य सरकारने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून नागपूर शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची पुणे पोलिस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. पुणे पोलिस आयुक्त रितेशकुमार यांची राज्याच्या होमगार्डच्या महासमादेशकपदी नियुक्ती केली आहे.
पुणे शहराचे आयुक्त राहिलेले रितेश कुमार यांची पदोन्नती झाली आहे. त्यांच्या जागी आता अमितेश कुमार यांची नियुक्ती झाली आहे. अमितेश कुमार यांनी आज आपला पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी लगेच माध्यमांची संवाद साधला. यावेळी बोलत असताना त्यांनी क्राईम कंट्रोल टॉपमोस्ट प्रायोरिटी असेल सांगतानाच गुन्हेगारांना इशारा देखील दिला आहे. याशिवाय त्यांनी कोयत्याचा वापर करणाऱ्यावर परिणामकारक कारवाई करणार असल्याचेही सांगितले. बेसिक पोलिसिंग, व्हिजीबल पोलिसिंग, लॉ ॲंड ॲार्डर यावर विशेष भर राहणारा असून पुणे शहरातील वाहतुकीची समस्या, महिला बाल सुरक्षा , व्हीआयपी सिक्युरिटी, सायबर गुन्हे हे देखील आपल्या कामकाजातील महत्वाचे मुद्दे असतील असे सांगितले.